विविधतेत एकता जपणारा भारत हा सणांचा देश आहे. त्यात गणेशोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय उत्साहात साजरा केला जाणारा सण आहे. दरवर्षी भाद्रपद चतुर्थी ते चतुर्दशी या काळात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो.
सध्याचं कोरोना संकट पाहता सार्वजनिकपणे उत्सव साजरा करणं शक्य नाही. आपल्याला जवळच्या व्यक्तींसोबत अधिक वेळ व्यतित करता येतोय, ही लॉकडाऊनची सकारात्मक बाजू आहे. तसाच, यंदाचा गणेशोत्सवही आपल्याला घरी आपल्या माणसांसोबत साजरा करता येणार आहे.
गणेशोत्सवाचा अद्वितीय आनंद देण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून 'लोकमत' आणि 'माझा' एकत्र येऊन 'माझा मोदक स्पर्धे'च्या माध्यमातून विविध स्पर्धा आणि लाईव्ह कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत. या स्पर्धेत आम्ही प्रेक्षक आणि स्पर्धकांना 'माझा'चा वापर करून तयार केलेल्या पदार्थांची पाककृती पाठवण्यासाठी प्रोत्साहित करतो.
गणेशोत्सवाचा विचार करताच आपल्याला सर्वप्रथम बाप्पांचे आवडते मोदक आठवतात. गणेशोत्सव आणि 'माझा' यांच्यामध्ये एक समान धागा आहे. गणेशोत्सव महाराष्ट्राचा सण आहे आणि 'माझा' महाराष्ट्रामधल्या रत्नागिरीतल्या अस्सल हापूस आंब्यांपासून तयार केला जातो. हापूस आंब्यांपासून तयार करण्यात आलेल्या माझाचा वापर करून आपण चविष्ट मोदक तयार करू शकतो.
अस्सल हापूस आंब्यांपासून तयार करण्यात आल्यानं माझा कोणत्याही पिठासोबत सहज एकजीव होतो. गोड आणि घट्ट माझामुळे मोदक चविष्ट होतात. त्यामुळे माझा उत्सवातला सर्वोत्तम साधीदार ठरतो आणि उत्सावाचा आनंदही द्विगुणीत होतो.
गणेशोत्सवातील आनंद वाढवण्यासाठी आणि मोदक आणखी स्वादिष्ट करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय माझा मोदक रेसिपी शो. या कार्यक्रमात गणेशोत्सवाच्या १० दिवसांमध्ये महाराष्ट्रातील सुपर शेफ मोदकांच्या १० वेगवेगळ्या रेसिपी दाखवतील. २१ ऑगस्ट सकाळी ११ वाजल्यापासून Lokmat.com आणि Youtube.com/Lokmat हा शो दररोज पाहता येईल.
आज सकाळी ११ वाजता माझा मोदक रेसिपी शो लाईव्ह पाहता येईल. यामध्ये आपल्या चविष्ट आणि तोंडाला पाणी आणणाऱ्या रेसिपींसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सुपर शेफ मधुरा बाचल यांचा सहभाग असेल. मधुरा जगातील ख्यातनाम शेफ असून त्या अनेक भारतीय पदार्थांच्या स्वादिष्ट रेसिपी शेअर करत असतात. अमेरिका, कॅनडा आणि अनेक देशांमध्येही त्या लोकप्रिय आहेत. मधुरा बाचल यांची युट्यूबवर अनेक रेसिपी चॅनल्स आहेत. या चॅनेल्सच्या सबस्क्रायबर्सची संख्यादेखील मोठी आहे. अतिशय सहज पद्धतीनं आणि सोप्या शब्दांमध्ये रेसिपी सांगण्याचं आणि ती करून दाखवण्याचं कौशल्य मधुरा यांच्याकडे आहे.
मधुरा यांची चविष्ट मोदक रेसिपी पाहण्यासाठी दुपारी १२ वाजता https://www.youtube.com/Lokmat, https://www.youtube.com/MadhurasRecipeMarathi आणि Lokmat.com/MaazaModak ला भेट द्या.
माझानं तुमच्यासाठी माझा मोदक स्पर्धादेखील आणली आहे. #MaazaModak स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुमच्या रेसिपींचे व्हिडीओ lokmat.com/maazamodak वर अपलोड करा. स्पर्धेतील पहिल्या पाच विजेत्यांना अॅपल आयफोन ७ आणि त्यानंतरच्या पाच विजेत्यांना अॅमेझॉन इको डॉट (सेकंड जनरेशन) बक्षीस म्हणून मिळेल.
रेसिपी करायला आतूर झाला आहात?... तुम्हीही बनवू शकता झक्कास माझा मोदक. www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझा खरेदी करा आणि आपल्या साहित्यासह सज्ज व्हा!
'MAAZAMODAK' हा कोड वापरा आणि १.२ लिटरच्या बॉटलवर/बाटलीवर मिळवा १०% सूट. आजच खरेदी करा!