'अन्न हे पूर्णब्रह्म' हा मंत्र जपत ग्राहकांना पारंपरिक, घरगुती चवीचा आस्वाद देत स्वादिष्ट अचार आणि पापड बनविणाऱ्या लोकप्रिय 'राम बंधु' या उत्पादक कंपनीने या क्षेत्रात त्यांच्या सीमा विस्तारल्या आहेत. वेगाने वाढणाऱ्या एफएमसीजी कंपन्यांपैकी एक 'एम्पायर स्पाईसेस अँड फूड्स लिमिटेड'ने (ईएसएफएल) त्यांचा प्रमुख ब्रँड 'राम बंधु' यांच्या अचार आणि पापडसाठी बॉलीवूड सुपरस्टार माधुरी दीक्षित-नेने यांची ब्रँड अम्बॅसेडर म्हणून निवड केली आहे. 'आपला टेस्ट पार्टनर' कॅम्पेनमध्ये माधुरी अनोख्या अंदाजात झळकणार असून विविध प्रकारांचे अचार आणि पापड ग्राहकांचं आयुष्य अधिक आनंददायी कसं बनवतात, या संदेशाचा प्रसार करणार आहेत. 'जर डान्स पार्टनर जबरदस्त असेल तर डान्समध्ये जिवंतपणा येतो. अगदी तसंच जर रोजच्या जेवणामध्ये तुमचा टेस्ट पार्टनर 'राम बंधु' यांचे चविष्ट अचार आणि पापड असतील तर आयुष्य अधिक गोड, खुसखुशीत आणि मसालेदार होईल' असा संदेश माधुरी हटके लूकमध्ये देत आहेत.
काळानुरूप नवनवीन खाद्यपदार्थ आले तरी जेवणाच्या ताटात आजही अचार आणि पापडचे महत्व कायम आहे. 'राम बंधु' या विश्वसनीय उत्पादक कंपनीने लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणाऱ्या या पारंपरिक पदार्थांच्या ब्रॅंडिंगसाठी संपूर्ण देशाची आवडती अभिनेत्री माधुरीची निवड केल्याने ग्राहक तसेच चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
“अचार हा पदार्थ प्रत्येकजण लहानपणापासून खात आला आहे, प्रत्येकाच्या त्याच्याशी घट्ट आठवणी आहेत. मग ती आठवण आज्जीचे प्रेम असो किंवा आईची माया! 'आपला टेस्ट पार्टनर' कॅम्पेनसोबत जोडले जाताना माझ्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला जेव्हा अचार आणि पापड खाणे म्हणजे एक वेगळाच अनुभव होता. 'राम बंधु' या लोकप्रिय, सन्मानित ब्रँडच्या कॅम्पेनचा भाग होताना मला खूप आनंद होत आहे.'' असा विश्वास अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने यांनी व्यक्त केला.
“आमचे पदार्थ देशभरात प्रसिद्ध आहेतच, पण या नवीन कॅम्पेनमुळे आम्हाला शहरी आणि ग्रामीण अशा देशभरातील ग्राहकांच्या अधिक जवळ जाता येईल, त्यांची मने जिंकता येतील. आम्हाला असा ब्रँड अम्बॅसेडर हवा होता जो आमच्या ग्राहकांचे प्रतिनिधित्व करेल आणि माधुरी दीक्षित-नेने या कॅम्पेनसाठी अगदी योग्य आहेत. एक दिग्गज बॉलिवूड अभिनेत्री म्हणून त्यांची लोकप्रियता देशविदेशात आहे. प्रत्येक पिढ्यांमध्ये त्यांचे चाहते आहेत शिवाय त्या उत्तम वर्किंग मदरसुद्धा आहेत. गुणवत्ता आणि नावीन्यतापूर्ण पदार्थ हे आमच्या यशस्वी प्रवासाचे आधारस्तंभ असून माधुरी यांची प्रतिमा, विचार आमच्या ब्रँडच्या ध्येयाशी मिळतेजुळते आहेत.'' असे ईएसएफएलचे अध्यक्ष, हेमंत राठी म्हणाले. आयुष्यातील विविध पार्टनर, उदाहरणार्थ वर्क पार्टनर, ट्रॅव्हल पार्टनर, गॉसिप पार्टनर अशा वेगवेगळ्या स्वभावांचे पार्टनर असल्याने जगण्याला वेगळीच उम्मेद मिळते. अगदी त्याच पद्धतीने 'राम बंधु'ची ओळख ही केवळ उत्पादक करणारी कंपनी नसून प्रत्येकाच्या आयुष्यातील जणू एक लाईफ पार्टनरच आहे, असा संदेशही देण्यात आला आहे.
“भारतात अचार, पापडच्या बाजारपेठेत वाढीची मोठी संधी आहे. 'राम बंधु' हे या पदार्थांच्या उत्पादनातील आघाडीच्या ब्रँडपैकी एक असून ग्राहक विविध प्रसंगी वापरण्यासाठी यांचे पदार्थ विकत घेतात. घरगुती ते हॉटेल्स, कँटीन आदी वेगवगेळ्या ठिकाणी या पदार्थांची मोठ्या प्रमाणावर मागणी असून परदेशातही त्यांची निर्यात केली जाते. आम्ही नेहमीच काळानुरूप बदलता स्वाद, ट्रेंड आणि तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यावर विश्वास ठेवतो. 'ग्राहकांचे मन जिंकणे' हे आमचे ध्येय असून देशातील प्रत्येक स्वयंपाक घरात आणि भारतीयांच्या मना मनात स्वतःचे स्थान निर्माण करणे हे आमचे लक्ष्य आहे.'' असे ईएसएफएलचे व्यवस्थापकीय संचालक उमेश राठी म्हणाले.
बेटेल लीफ कम्युनिकेशन्सने या कॅम्पेनची संकल्पना मांडली आहे. “आमची संकल्पना ही केवळ विक्री करण्यापुरती मर्यादित नसून या प्रभावी संकल्पनेच्या माध्यमातून हा लोकप्रिय ब्रँड सर्वांपर्यंत पोहोचावा अशी आहे.'' असे बेटेल लीफ कम्युनिकेशन्सचे क्रिएटिव्ह हेड रिषी उपाध्येय म्हणाले. “ही जाहिरात अतिशय उत्साहवर्धक आहे. 'राम बंधु' केवळ अन्नपदार्थ बनवणारी कंपनी नसून सर्वोत्कृष्ट चव, उत्तम दर्जाचे पदार्थ बनवणारा आणि प्रत्येक ग्राहकाशी नाते जोडणारा एक पार्टनर आहे.'' असे या जाहिरातीची निर्मिती करणारी एजन्सी ओबेरॉय आयबीसीचे व्यवस्थापकीय संचालक आनंद ओबेरॉय म्हणाले.
ईएसएफएलच्या ब्रँड पोर्टफोलिओमध्ये राम बंधु, आरबीएम, टेम्पटीन आणि झायका या ब्रॅण्ड्सचा समावेश आहे. भारतातील १२ पेक्षा अधिक राज्यांमधील बाजारपेठांमध्ये अर्ध्या दशलक्षाहूनही अधिक किरकोळ दुकाने, मोठ्या प्रमाणावरील फिल्ड स्टाफ आणि वितरकांची विस्तृत साखळी असणारी सुसज्ज टीम आहे जी ग्राहकांना सर्वोत्तम उत्पादने आणि पदार्थांची चव पुरवण्यासाठी समर्पित आहे.