मंकर संक्रातीला अवघे काही दिवस उरले आहेत. घरोघरी लाडू तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. अनेकांकडे मेथीचे लाडू वळून तयार सुद्धा झाले. तीळाचे लाडू असो किंवा मेथीचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुळ. गुळाचे शरीराला अनेक फायदे होतात म्हणून हिवाळ्याच्या दिवसात शरीराला पोषण मिळण्याठी अनेकजण पदार्थांमध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर करतात. पण तुम्ही वापरत असेल्या गुळ बनावट असेल तर याचा काहीही उपयोग होणार नाही. आज आम्ही तुम्हाला बनावट आणि चांगला गुळ कसा ओळखायचा याबाबत सांगणार आहोत.
बनावट गूळाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट सारखी घातक रसायने सहसा भेसळयुक्त गुळामध्ये मिसळली जातात. जी शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहेत. कॅल्शियम कार्बोनेट गुळाचे वजन वाढवण्यासाठी, तर सोडियम बायकार्बोनेटचा वापर गुळाला योग्य रंग देण्यासाठी वापरले जाते.
असं तपासून पाहा
दुकानातील गुळ पांढरा, हलका पिवळसर तर बनावट गूळाचा काही भाग हा लालसर असेल. जर आपण असा भेसळयुक्त गूळ पाण्यात ठेवाल तर त्यातील भेसळयुक्त पदार्थ हे भांड्याखाली बसतील, तर चांगला गूळ पाण्यात पूर्णपणे विरघळेल. चांगल्या गुळाची निवड करताना त्याचा रंग पाहणं गरजेचे असते. नेहमीच रंगाने तपकिरी असलेल्या गुळाची निवड करा
भेसळ झाल्यामुळे बनावट गूळ हा पिवळसर किंवा फिक्कट तपकिरी रंगाचा दिसतो. असा रंग असलेला गूळ निवडणे टाळा. ऊसाच्या रसातील अशुद्धतेमुळे आणि उकळल्यामुळे रासायनिक प्रक्रिया होऊन, गुळाचा रंग गडद लाल किंवा तपकिरी होतो. यानंतर, त्यात काही नैसर्गिक गोष्टी मिसळून त्यातील अशुद्धता दूर केल्या जातात.
या पिवळ्या व स्वच्छ दिसत असलेल्या गुळात फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड रेग्युलेशन २०११ च्या कायद्यानुसार गुळात जास्तीत जास्त ७० पीपीएम इतके सल्फर डाय आॅक्साईड वापरण्याची परवानगी आहे. रसायनाचा अधिक वापर केल्याने अनेक जीवघेणे आजार होण्याची शक्यता असते. यामुळे रसायनाचा वापर न करता सेंद्रीय पद्धतीने गूळ तयार करणे आरोग्यासाठी फायद्यासाठी ठरते. मात्र, फायदा मिळवण्यामुळे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवत असल्याचा आरोप ग्राहक करतात.