हॉटेलसारखा लोणी स्पंज डोसा खायला आता बाहेर जाण्याची गरज नाही. मस्त मऊसूत, चवदार आणि खरपूस दावणगिरी पद्धतीचा डोसा घरीही बनवता येऊ शकतो. ही घ्या पाककृती.
साहित्य :
साबुदाणे १/२ वाटी
उडिद डाळ १/२ वाटी
जाडे पोहे १ वाटी
तांदूळ ४ वाट्या
मेथीचे दाणे १५ते २०
मीठ चवीनुसार
खाण्याचा सोडा लहान चमचा
लोणी पाव वाटी
कृती-
- सर्व साहित्य वेगवेगळ्या भांड्यात ठेवून सात तास भिजवून ठेवा.
- मिक्सरच्या भांडयात सर्व पदार्थ एकत्र करून बारीक वाटून घ्या.
- पीठ वाटताना खूप पाणी घालू नका.
- पीठ एकदम बारीक होईल याची काळजी घ्या.
- आत तयार पिठात एक छोटा चमचा खाण्याचा सोडा व मीठ घालून एकजीव करा.
- आता तयार झालेले पीठ उष्ण जागेत शक्यतो अंधारात रात्रभर झाकून ठेवा.
- पीठ फुलून आल्यावर आता तवा तापत ठेवा.
- तव्याला चमचाभर तेल लावून घ्या. (ग्रीसिंग)
- आता तवा जास्त न तापू देतात थोड्या उंचीवरून मिश्रण तव्यावर सोडा.
- पीठ फार घट्ट आणि पातळ न करता जेमतेम पसरेल असे ठेवा.
- त्यामुळे डोसा परफेक्ट होईल.
- एक बाजू उलटून दुसऱ्या बाजूवर लोण्याचे गोळे टाका.
- तीही बाजू खरपूस भाजल्यावर सर्व्ह करा गरमागरम दावणगिरी लोणी स्पंज डोसा.
- हा डोसा बटाट्याची भाजी आणि ओल्या नारळाच्या चटणीसोबत उत्तम लागतो.