अनेकजण सकाळच्या नाश्त्यामध्ये पोह्यांचा समावेश करतात. पोह्यांचा हेल्दी डाएटमध्ये समावेश केला जातो. पोह्यांचे अनेक आरोग्यदायी फायदेही सांगितले जातात. कोणत्याही वयाच्या लोकांसाठी पोहे अत्यंत फायदेशीर ठरतात. पण जर नाश्त्याव्यतिरिक्त पोह्यांपासून जर एकादा हटके पदार्थ तयार केला तर? गोंधळू नका. सध्या फूड इंडस्ट्रिमध्ये अनेक बदल घडून येत आहेत. तुम्हीही थोडा हटके विचार केला तर उत्तम राहिल. आज आम्ही तुम्हाला पोह्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या हेल्दी लाडूंची रेसिपी सांगणार आहोत.
हेल्दी आणि टेस्टी पोह्यांचे लाडू
सध्या फेस्टिव्ह सिझन सुरू असून सर्वात जास्त भिती वाटते ती, भेसळयुक्त मिठाईंची. अशातच घरीच तयार केलेले पोह्यांचे लाडू एक हेल्दी आणि टेस्टी ऑप्शन आहे. या होममेड लाडूंमध्ये तुम्ही तुम्हाला पाहिजे ते पदार्थ एकत्र करू शकता.
पोह्यांपासून लाजू तयार करण्यासाठी लागणारं साहित्य :
- 150 ग्रॅम पोहे
- तूप
- अर्धा चमचा हिरवी वेलची पावडर
- किसलेले काजू
- 100 ग्रॅम पिवळी मूगाची डाळ
- 50 ग्रॅम शेवया
- दीड कप साखर
पोह्यांचे लाडू तयार करण्याची कृती :
- सर्वात आधी मंद आचेवर एक पॅन गरम करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये पोहो एकत्र करून 3 ते 4 मिनिटांसाठी भाजून घ्या.
- पोहे भाजल्यानंतर दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्या. त्यानंतर मूगाची डाळ, शेवया आणि किसलेले काजूही ड्राय फ्राय करून घ्या. त्यानंत थंड करून घ्या.
- जेव्हा सर्व साहित्य व्यवस्थित थंड होईल त्यानंतर मिक्सरमध्ये वेगवेगळं बारिक करून घ्या.
- त्यानंतर पॅनमध्ये तूप घेऊन शेवया फ्राय करा. त्यानंतर पोहे, मूगाची डाळ तूपामध्ये फ्राय करून घ्या.
लाडू बांधून घ्या...
आता एका मोठ्या प्लेटमध्ये सर्व बारिक केलेलं साहित्य घ्या. त्यामध्ये वेलची पावडर, काजू आणि साखर एकत्र करा. त्याचबरोबर गरम तूपही एकत्र करा. त्यामुळे लाडू वळणं सोपं होईल. त्यानंतर हाताला तूप लावून फ्राय करण्यात आलेलं साहित्य हातावर घेऊन त्याचे लाडू वळून घ्या. तुमचे पौष्टिक पोह्यांचे लाडू तयार आहेत. तुम्ही लगेच सर्व्ह करू शकता किंवा 3 ते 4 आठवड्यांसाठी स्टोअर करून ठेवू शकता.