साहित्यः ताजे दूध १ लीटर, साखर २०० ते २५० ग्रॅम, कॉर्नफ्लॉवर ३ टी स्पून, मिल्क पावडर ३ टी स्पून, जीएमएस व सीएमएस प्रत्येकी पाव चमचा, जिलेटीन १ सपाट टी स्पून
कृतीः ताजे दूध तापत ठेवा. एका कपात पाऊण कप मिल्क पावडर, कॉर्नप्लॉवर, जिलेटीन व जीएमएस पावडर घाला. थंड दुधात त्याची पातळ पेस्ट बनवा. साखरेमध्ये सीएमएस पावडर मिसळा. दुधाला उकळी आल्यावर तयार केलेली पेस्ट त्यात घाला. १ ते २ मिनिटे शिजवा. सीएमएस मिसळलेली साखर त्यात घाला. गॅस बंद करा. साखर विरघळू द्या व दूध आपोआप थंड होऊ द्या. दूध पूर्णपणे थंड झाले की, मिक्सरमधून चांगले फेटून घ्या व ट्रेमध्ये ओतून फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवा.
संकलनः उमेश कुलकर्णी