शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

तुम्ही चहाबरोबर काय खाता? बिस्किट आणि चिवडा यापलिकडे काही सूचत नसेल तर हे 9 पदार्थ ट्राय करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 6:44 PM

नेहेमी बिस्किटं आणि तोच तोच चिवडा खावून दुपारचा चहा रटाळ करण्यापेक्षा चहाची चव आणि उत्सुकता वाढवणारे पदार्थ शोधायला हवेत. तुमचा शोध सोपा करण्यासाठी ही काही पदार्थांची मदत.

ठळक मुद्दे* कोथिंबीरच्या खुसखुशीत वड्या . या जर चहासोबत असतील तर मग चहा प्यावा की वड्या खाव्यात असा प्रश्न पडू शकतो.* मावा केक आणि चहा. हे कॉम्बिनेशन पचनी पडत नसेल तर आधी टेस्ट करून पाहा. त्यासाठी तुमच्या शहरातल्या एखाद्या पारसी हॉटेलात जा.* निमकी चहाबरोबर खातच राहावा असा हा पदार्थ. शिवाय एकदा केला की हा पदार्थ टिकूनही राहातो.

 

- माधुरी पेठकरसकाळचा चहा बिस्किट, टोस्ट, बटर, खारी याबरोबर घेतला जातो. पण दुपारचा चहा. जरा स्पेशल असतो. जेवण करून तीन चार तास उलटलेले असतात आणि रात्रीच्या जेवणाला आणखी तीन चार तास उरलेले असतात. त्या संधीकाळात चहाबरोबर काय? हा प्रश्न पडतोच? बिस्किटं, चिवडा यापलिकडे फारशी मजल जातच नाही. आणि त्याचा कंटाळा आला तर मग तेही नाही. गरम चहा चवदार तेव्हाच होतो जेव्हा चहाबरोबर खाण्यासाठी काहीतरी विशेष चटकदार असतं. आता तुम्ही म्हणाल रोजच दुपारी चहा प्यावा लागतो. रोज नवीन काय शोधणार? तर शोधायला गेलात तर भरपूर सापडेल. मुळातच आपल्या भारतीय खानपानसंस्कृती प्रत्येक प्रकारच्या पदार्थांची लयलूट आहे. त्यात चहाबरोबरच्या पदार्थांचा खजिनाही खूप मोठा आहे. प्रांतोप्रांती चहाबरोबर काय खाल्लं जातं हे जरी बघितलं तरी आपल्याला खूप पर्याय सापडतील. शिवाय हे पर्याय विकतच्या पदार्थांवर अवलंबून नाही. घरच्याघरी सहज बनवता येतात हे पदार्थ. त्यामुळे नेहेमी बिस्किटं आणि तोच तोच चिवडा खावून दुपारचा चहा रटाळ करण्यापेक्षा चहाची चव आणि उत्सुकता वाढवणारे पदार्थ शोधायला हवेत. तुमचा शोध सोपा करण्यासाठी ही काही पदार्थांची मदत.चहाबरोबर हे खा1 कोथिंबीर वडी

कोथिंबीरच्या खुसखुशीत वड्या . या जर चहासोबत असतील तर मग चहा प्यावा की वड्या खाव्यात असा प्रश्न पडू शकतो. दोघंही एकमेकांसोबत खूपच चविष्ट लागतात. इतक्या की वाटतं कपातला चहा संपू नये की डिशमधल्या वड्या.

2 मिरची बज्जी

आंध्रप्रदेशातला हा पदार्थ. हिरव्या मिरच्या, चिंच आणि नारळ यांचा वापर करून आणि तळून हा पदार्थ केला जातो. गरम गरम मिरची बज्जी कांद्यासोबत सर्व्ह केली जाते.3 कलमी वडा

राजस्थानातला हा पदार्थ. सोनेरी रंगावर तळलेले हे कलमी वडे पाहिले की तोंडाला पाणी सुटतं. हिरव्या चटणीसोबत गरमागरम मिश्र डाळींचा हा वडा आणि सोबत वाफळ्ता चहा.. काय कॉम्बिनेशन आहे?

4 आलू बोंडे

महाराष्ट्रात आता हे आलू बोंडे आवडीने करतात पण हा मूळ कर्नाटकचा पदार्थ. दुपारी कोणाला चहाचं आमंत्रण असेल तर आपल्याला चहाबरोबर आलू बोंडे खायला मिळणार हे त्यानं समजून घ्यावं. मसालेदार बटाट्याच्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बेसन पिठाच्या मिश्रणात घोळवून तळले जातात आणि कोथिंबीरच्या चटणीसोबत खाल्ले जातात.

5) मावा केक

मावा केक आणि चहा. हे कॉम्बिनेशन पचनी पडत नसेल तर आधी टेस्ट करून पाहा. त्यासाठी तुमच्या शहरातल्या एखाद्या पारसी हॉटेलात जा. आणि तिथे चहाबरोबर कॉफी ही टेस्टी ट्रीट स्वत:लाच देवून पाहा. खरंतर या मावा केक सोबत कॉफी बेस्ट लागते.

 

6) खस्ता कचोरी

उत्तरप्रदेशात तर चहासोबत खस्ता कचोरी दिली नाही तर ‘बहोत बडी गुस्तागी’ मानतात. मैद्याची पारी, त्यात मसूर डाळीच्या मिश्रणाचं सारण. खरपूस तळलेली ती खुसखुशीत खस्ता कचोरी उत्तर प्रदेशात काय कोणत्याही प्रदेशातल्या चहाबरोबर हवीहवीशीच वाटेल.

7) मुरूक्कू

दक्षिणेकडे चहासोबत मसूर डाळीपासून बनवलेले मुरूक्कू खाण्याची पध्दत आहे. गरम गरम चहा आणि कुरकुरीत मुरूक्कू ‘एनी टाइम मंगता है’कॅटेगिरीतले.

 

8) दिल्लीचा आलू चाट

पूर्वी दिल्ली खूप दूर होती. पण आता हाकेच्या अंतरावर आहे. म्हणूनच हे दिल्लीमध्ये खाल्लं जातं ते आपणही सहज ट्राय करून बघू शकतो. बटाटयाच्या फोडी तेलात तळल्या जातात. त्यावर कोथिंबीरची चटणी, गोड चटणी आणि चाट मसाला टाकून आलू चाट तयार केला जातो. 

9) निमकी

बंगालमधली विशेषता पनीर आणि लोणची यावरच संपते असं नाही तर निमकी हे ही तिथलं विशेषच. मैद्यात ओवा, कांद्याचं बी आणि मीठ टाकून ते मळलं जातं. त्याच्या पुºया करून त्या चांगल्या तुपात तळल्या की निमकी तयार. चहाबरोबर खातच राहावा असा हा पदार्थ. शिवाय एकदा केला की हा पदार्थ टिकूनही राहातो.