उन्हाळा म्हणजे आंब्यांचा सीझन. एप्रिल ते मे महिन्यापर्यंत आब्यापासून तयार केलेले अनेक पदार्थ चाखयाची संधी मिळते. घराघरांमध्ये आमरस-पुरी, आंब्याचा शिरा यांसारख्या पदार्थांचा घाट घातला जातो. बाहेर अस्वस्थ करणाऱ्या उकड्यापासून सुटका करून घेण्यासाठी तुम्ही मँगो लस्सी ट्राय करू शकता. ही थिक, क्रीमी मँगो लस्सी रेसिपी तुम्ही घरीच तयार करू शकता. ही रेसिपी अगदी सोपी असून तुम्ही काही वेळातच लस्सी तयार करू शकता.
थिक आणि क्रीमी लस्सी तयार करण्यासाठी यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करू नका. जर तुम्हाला थिक लस्सी नको असेल तर लस्सी तयार करताना तुम्ही थंड पाणी वापरू शकता. उन्हाळ्यामध्ये मँगो लस्सी शरीराला ऊर्जा देण्यास मदत करते. तसेच ही लस्सी तयार करताना वापरण्यात येणाऱ्या दह्यामध्ये प्रोबायोटिक गुणधर्म शरीराला थंडावा देण्यासाठी मदत करतात. लस्सी तयार करताना तुम्ही वेलचीचाही वापर करू शकता. वेलची आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. जाणू घेऊया घरच्या घरी मँगो लस्सी तयार करण्याती रेसिपी...
साहित्य :
- आंबा
- साखर
- दही
- वेलची पावडर
- पुदिन्याची पानं
- बर्फाचे तुकडे
कृती :
- दोन पिकलेले आंबे घेऊन त्यांचे छोटे-छोटे तुकडे करून घ्या.
- त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचे छोट तुकडे, दही, साखर आणि बर्फाचे तुकडे एकत्र करून बारिक करा.
- एका ग्लासामध्ये तयार मिश्रण काढून त्यावर पुदिन्याची पानं एकत्र करा.
- टेस्टी आणि हेल्दी मँगो लस्सी तयार आहे.