Green Chutney for Uric Acid Control: यूरिक अॅसिड हा एक अपशिष्ट पदार्थ आहे जो प्यूरिन असलेल्या पदार्थांचं सेवन केल्याने शरीरात तयार होतो. यूरिक अॅसिड सामान्यपणे किडनीद्वारे फिल्टर करून शरीरातून बाहेर काढलं जातं. पण जेव्हा यूरिक अॅसिड प्रमाणापेक्षा जास्त वाढलं असेल तर किडनी त्याला योग्यपणे फिल्टर करू शकत नाही. अशात शरीरात यूरिक अॅसिड सगळीकडे पसरू लागतं. याचे क्रिस्टल हात-पायांच्या जॉईंट्समध्ये जमा होतात आणि सूजेचं कारण बनतात. अशात आहारात काही गोष्टींचा समावेश करून यूरिक अॅसिड कमी केलं जाऊ शकतं. यात एक हिरवी चटणी तुमच्या कामात येऊ शकते. याच्या सेवनाने यूरिक अॅसिड कमी होतं. ही खास चटणी पदीना आणि कोथिंबीरपासून तयार केली जाते. चला जाणून घेऊ याचे फायदे आणि चटणीची रेसिपी.
यूरिक अॅसिड कमी करणारी चटणी
यूरिक अॅसिड कमी करण्यासाठी ही चटणी तुम्ही सहजपणे घरी तयार करू शकता. या चटणीमध्ये अनेक आयुर्वेदिक गुण असतात, जे यूरिक अॅसिड शरीरातून कमी करू लागतात. ही चटणी तयार करण्यासाठी कोथिंबीर, लसूण, पदीना, लिंबाचा रस, आलं आणि जिऱ्याची गरज लागेल.
कशी बनवाल ही चटणी?
कोथिंबीर आणि पदीन्याची चटणी बनवण्यासाठी आधी समान प्रमाणात कोथिंबीर आणि पदीन्याची पाने चांगली स्वच्छ धुवून घ्या. ही पाने मिक्सरमध्ये टाका. त्यात ३ ते ४ लसणाच्या कळ्या, आल्याचा छोटा तुकडा, थोडा लिंबाचा रस, अर्धा चमचा जिरे आणि टेस्टनुसार काळं मीठ टाकून बारीक करा. तुमची पदीन्याची चटणी तयार आहे. या चटणीच्या सेवनाने जेवणाची टेस्ट तर वाढेलच, सोबतच शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतील. यूरिक अॅसिडची समस्या असणाऱ्या लोकांनी ही चटणी रोज चपाती किंवा पराठ्यांसोबत सेवन करावी. या चटणीने यूरिक अॅसिडमुळे वाढलेली हात-पायांवरील सूजही कमी होते.
इतर काही उपाय
- हाय यूरिक अॅसिड कमी करण्यासाठी लिंबाचा रसही पिऊ शकता. थंड लिंबू पाणी पिण्याऐवजी हलक्या कोमट पाण्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका आणि याचं सेवन करा. व्हिटॅमिन सी भरपूर असलेल्या लिंबू पाण्याने यूरिक अॅसिड कमी करण्यास मदत मिळते.
- चेरीज खाऊनही यूरिक अॅसिडचं प्रमाण कमी करता येऊ शकतं. तुम्ही चेरीजचा ज्यूसही सेवन करू शकता. यात अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण भरपूर असतात. तसेच यात फायबरही असतं. ज्यामुळे यूरिक अॅसिडचा प्रभाव कमी होतो.
- एक ग्लास पाण्यात २ चमचे अॅपल सायडर व्हिनेगर सेवन करू शकता. अॅपल व्हिनेगरने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. तसेच याने यूरिक अॅसिडही कमी होतं.
- आल्याच्या सेवनाने यूरिक अॅसिड कमी करण्यास फायदा मिळतो. आल्यामध्ये अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण भरपूर असतात ज्यामुळे सूजही कमी होते.
- हळदीमध्येही अनेक औषधी गुण असतात. त्यामुळे आहारात वेगवेगळ्या पद्धतीने हळदीचा समावेश करा. यानेही यूरिक अॅसिड कमी होण्यास मदत मिळते.