काही जण खाण्याचे शौकीन असतात. त्यांना नवनवीन पदार्थ चाखायला आवडतं. त्याचप्रमाणे अनेकांना देश-विदेशातील नवनवीन पदार्थ चाखायला फार आवडतात. एखाद्या शहरातील पारंपारिक खाणं आवडतं किंवा एखाद्या देशातील स्ट्रीट फूड. पण जगभरातील काही पदार्थ असे आहेत की, जे तुम्ही तुमची सर्व संपत्ती विकली तरी खरेदी करू शकत नाही. जगभरात असे काही पदार्थ आहेत की, जे पदार्थ खाण्यासाठीच नाही, तर नुसतं चाखण्यासाठीही कोट्यावधी रूपये खर्च करावे लागतात. जाणून घेऊयात देशाविदेशातील अशा काही पदार्थांबाबत जे जगभरातील सर्वात महागडे पदार्थ म्हणून ओळखले जातात.
1. यूबरी किंग मेलन्स
खरबूजाचा एक प्रकार असणारं हे फळ खाण्यासाठी तुम्हाला लाखो रूपये खर्च करावे लागतात. हे फळ यूबरी किंग मेलन्स या नावाने ओळखलं जात असून याच्या गोड चवीमुळे याची किंमत 14 लाख रूपये आहे. या फळाचा लिलाव करण्यात येतो. 2008मध्ये 100 पेक्षा जास्त खरबुज ब्लॉक करण्यात आले होते. सध्या एका बिजनेसमॅनने हे खरबुज 14,08,991 रूपयांमध्ये खरेदी केलं.
2. अलमास केवियर
हा पदार्थ इराणचा आहे. केवियर म्हणजे एका वेगळ्या प्रकारच्या माशाच्या अंड्यांपासून तयार करण्यात येणारी डिश. हा पदार्थ सर्वात महागड्या पदार्थांपैकी एक आहे. या माशांची अंडी फार महाग असतात. हा पदार्थ संपूर्ण लंडनमध्ये केवियर हाउस अॅन्ड प्रुनियर नावाच्या स्टोरमध्येच मिळतो. या स्टोरमध्ये केवियर किलोने विकण्यात येत असून 24 कॅरेट गोल्डच्या डब्ब्यामध्ये विकलं जातं. याची किंमत 15 लाख, 31 हजार रुपये आहे.
3. इटालियन व्हाइट अल्बा ट्रफल
इटलीमधील व्हाइट अल्बा ट्रफल जगातील सर्वात महाग पदार्थ आहे. या ट्रफलची किंमत 160,406 डॉलर म्हणजेच 99,60,723 रूपये आहे. हे ट्रफल हाँगकाँगमधील एका व्यक्तीनं आपल्या पत्नीसाठी खरेदी केलं होतं. त्याने खेरदी केलेल्या ट्रफलचं वजन 1.51 किलोग्रॅम होतं.
4. डेनसुके ब्लॅक वॉटरमेलन
कलिंगड आपण सर्वच खातो. अगदी साधारण किंमतीमध्ये कलिंगड सहज बाजारामध्ये उपलब्ध होतात. परंतु जपानमधील या कलिंगडासाठी तुम्हाला 4 लाख रूपये खर्च करावे लागतात. हे कलिंगड जपानमधील होक्केंदो शहरात मिळतात. संपूर्ण वर्षभरात फक्त एक डझन कलिंगडांचं उत्पादन घेण्यात येतं. हे कलिंगड खाण्यासाठी फार चविष्ट असतात. हे 4 लाख रूपयांमध्ये फक्त 17 पाउंड (7.71 किलो) इतकेच मिळतात.
5. डोमेनिको क्रोल्लाज पिज्जा रोयल 007
डोमेनिको क्रोल्लाज या शेफने तयार केलेला हा पिझ्झा त्यांच्याच नावावारून ओळखला जातो. 12 इंच आकाराच्या या पिझ्झामध्ये कॉग्नॅकमध्ये (एक प्रकारची द्राक्षांची दारू) भिजवण्यात आलेले लॉबस्टर, शॅम्पेनमध्ये भिजवण्यात आलेले केवियर, टॉमेटो सॉस, स्टॉकिश सॅलमन यांसारख्या पदार्थांचा वापर करण्यात येतो. एवढंचं नाही तर या पिझ्झावर 24 कॅरेट गोल्डचे फ्लेक्स टाकण्यात येतात. या पिझ्झाची किंमत 2 लाख, 57 हजार रुपये इतकी आहे.
6. मटेक या मॅटसुटेक मशरूम
हे जगातील सर्वात महागडं मशरूम आहे. हे मशरूम फक्त आशिया, नॉर्थ अमेरिका आणि जपानमध्ये मिळतात. जपानच्या रेड पाइनच्या झाडांच्या पडलेल्या पानांवर हे उगवतात. याची शेती करणं फार सोपं आहे. जपानमध्ये दरवर्षी हजार टनची मॅटसुटेकची शेती करण्यात येते. या मशरूमची किंमत 62 हजार रुपये आहे.
7. फ्रोजेन हॉट चॉकलेट आइसक्रीम सनडे
सर्वात महागड्या पदार्थांमध्ये फ्रोजेन हॉट चॉकलेट आइसक्रीम सनडे या आइसक्रीमचा समावेश होतो. ही आइसक्रीम न्यूयॉर्कमध्ये मिळते. ही आइसक्रीम खाण्यासाठी तुम्हाला 1,670,248 रूपये खर्च करावे लगतील. याची किंमत 16 लाख रूपये आहे.