शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

हे आहेत मुंबईकरांचे आवडते वडापाव स्टॉल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 11:35 AM

मुंबई किंवा आसपासच्या परिसरातून कामासाठी बाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांसाठी वडापाव हा मोठा आधार आहे.

ठळक मुद्देमुंबई आणि वडापावचं नातं काही वेगळंच आहे. गरिबांपासून श्रीमंत यांच्यातील एक सामाईक दुवा म्हणजे वडापाव.वडापाव आवडत नाही असा एकही मुंबईकर सापडणार नाही. कमी किंमतीत पोटभरणारं एक साधन म्हणजे.कित्येकांनी या त्यांच्या स्ट्रगलच्या काळात वडापाववर गुजराण करून स्वत:चं पोट भरलं आणि आता यशस्वी झाले आहेत.

मुंबई - मुंबई आणि वडापावचं नातं काही वेगळंच आहे. आपण मागेही एक बातमी वाचली की मुबंईतल्या दोन तरुणांनी लंडनमध्ये जाऊन वडापाव विक्री करायला सुरुवात केली आणि आता ते वडापाव व्यवसायाच्या जोरावर तब्बल कोटींची उलाढल करताहेत. गरिबांपासून श्रीमंत यांच्यातील एक सामाईक दुवा म्हणजे वडापाव. वडापाव आवडत नाही असा एकही मुंबईकर सापडणार नाही. कमी किंमतीत पोटभरणारं एक साधन म्हणजे. म्हणून सामान्यांच्या दृष्टीने या वडापावला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कित्येकांनी या त्यांच्या स्ट्रगलच्या काळात वडापाववर गुजराण करून स्वत:चं पोट भरलं आणि आता यशस्वी झाले आहेत. संपूर्ण मुंबईकरांना त्यांच्या पडत्या काळात पोट भरणाऱ्या या वडापावचे काही खास स्टॉल मुंबईभर आहेत. त्या ठिकाणी गेल्यावर तिकडचा वडापाव न खातच निघून जाणं म्हणजे अपराधच. चलातर पाहूया अशाच काही प्रसिद्ध वडापाव स्टॉल्सविषयी.

आणखी वाचा - लंडनमध्ये वडापावच्या व्यवसायातून दोन मुंबईकरांची कोटींची कमाई

अशोक वडापाव, दादर

दादरच्या किर्ती कॉलेजजवळचा वडापाव अख्ख्या मुंबईकरांचा ऑल टाईम फेव्हरेट. कॉलेज, ऑफिसेस या परिसरात असल्याने हा विभाग नेहमीच गजबजलेला असतो. त्यामुळे येणारे-जाणारे इथून हमखास वडापाव घेतल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही. गेल्या ३५ वर्षांपासून हा स्टॉल इथं आहे. वडापावसोबत मिळणारी चटणी तर प्रसिद्ध आहेच पण सगळ्यात प्रसिद्ध आहे ते म्हणजे वडापावसोबत मिळणारा चुरा. वडापावसोबत मिळणारा हा चुरा आपल्या वडापावला जास्त क्रंची करतो. त्यामुळे हा वडापाव फार प्रसिद्ध आहे. सुश्मिता सेन, सोनू निगम, माधुरी दिक्षित अशा सेलिब्रिटींनीही इथून वडापाव खालला आहे. 

ग्रॅज्यूएट वडापाव, भायखळा

गेल्या २० वर्षांपासून भायखळला स्थानकाच्या बाहेर असलेला ग्रॅज्यूएट वडापाव लोकल प्रवाशांमध्ये फार प्रसिद्ध आहे. हा परिसर पूर्वीपासूनच फार गजबजलेला आहे. कालांतराने परिसरात आणखी वस्ती वाढत गेली. त्यामुळे हा वडापावही आणखी प्रसिद्ध होत गेला. पण तरीही मालकाने हा स्टॉल असाच कायम ठेवला, लोकांना ज्याप्रमाणे खायला आवडतं तसंच जर आपण राहिलो तर आणखी ग्राहकांची ये-जा वाढेल या दृष्टीने मालकाने हा स्टॉल पूर्वीप्रमाणेच ठेवलाय. 

आणखी वाचा - इतकं मोठं बाहुबली सॅण्डविच पाहूनच पोट भरतं ! फोटो तर पाहा!

आराम वडापाव

सीएसटीच्या कॅपिटल सिनेमा इमारतीजवळ असलेला हा वडापाव धावत्या मुंबईकरांना नक्कीच माहित असेल. लसणाची लाल चटणी, हिरवी चटणी इकडे प्रसिद्ध आहे. १९३९ सालापासून हा स्टॉल इथे आहे. मुंबईतील जुना वडापाव स्टॉल म्हणूनही लोक इथं आकर्षित होत असतात. तसंच इकडची चटणी प्रसिद्ध आहेच. त्यामुळे ग्राहकांची चांगलीच पेटपूजा इथे होत असते. 

पार्लेश्वर वडापाव सम्राट

तुम्ही जर खरच वडापाव प्रेमी असाल तर या स्टॉलविषयी आणखी काहीच सांगायला नको. विलेपार्ले स्थानकाच्या अगदी बाहेर लागूनच असलेल्या या स्टॉलमध्ये तुम्हाला वडापवाचे अनेक प्रकार चाखायला मिळतील. इथला चीज आणि बटर वडापाव तर फारच प्रसिद्ध आहे. एवढंच नव्हे तर कांदा भजी, बटाटा भजी, समोसा असे स्नॅक्सही इथं प्रसिद्ध आहे. १९८६ साली सुरू झालेला हा छोटासा स्टॉल आता संपूर्ण मुंबईत प्रसिद्ध आहे. एवढंच नव्हे तर अनेद दिग्गज मंडळींनी या स्टॉलला भेट दिली आहे. 

गोली वडापाव नं. वन

गोली वडापाव नं. वन हे स्टॉल वजा हॉटेलचं यश सांगायचं झालं तर या हॉटेलचा वर्षभराचा टर्नओव्हर तब्बल १५ कोटी आहे. भारतात ६० शहरांमध्ये जवळपास ३०० स्टॉल्स यांनी स्थापले आहेत. मुंबईत चांदिवलीतील जॉन्सन डिसुझा चाळीत हे वडापावचं हॉटेल आहे. वडापावसोबतच तुम्हाला इतरही फास्ट फुड तुम्हाला चाखायला मिळू शकतात. 

खाद्यसंबंधित अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा

जय महाराष्ट्र वडा पाव

एका छोट्या स्टॉलपासून सुरुवात झालेला जय महाराष्ट्र वडापावची आता अंधेरी, जोगेश्वरी, सांताक्रुझ अशा प्रसिद्ध ठिकाणी स्टॉल्स आहे. इतरांप्रमाणेच या वडापावची चटणीच प्रसिद्ध आहे. १९६६ साली या स्टॉलची सुरुवात झाली होती. आता शहरात एका दिवसात १ हजाराहून अधिक वडापाव विकले जातात. या मालकाच्या आजीच्या हातून हा वडापाव तयार होतो. पण त्यांनी असा स्वादिष्ट वडापाव बनवण्यामागचं कारण अद्यापही कोणाला सांगितलेलं नाही. सँडविच आणि डोसाही इथंही फार छान मिळते. 

टॅग्स :foodअन्नMumbaiमुंबईDadar Stationदादर स्थानक