शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाली असून ठिकठिकाणी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अशातच अनेक लोकांनी नवरात्रीच्या उपवासाला सुरुवात झाली आहे. यातील काही लोकं अशीही आहेत जी नऊ दिवसांसाठी उपवास करतात. या उपवासादरम्यान ते फक्त फराळाचे पदार्थ खातात.
अशातच शिंगाड्याच्या पिठापासून तयार करण्यात आलेले पदार्थ किंवा बटाट्याचे पदार्थच खाणं पसंत करतात. परंतु फार कमी लोकांनाच माहीत असेल की, साबुदाण्याचा वापर करूनही आपण अनेक पदार्थ तयार करू शकतो. ज्यामुळे तुम्हाला उपवासाच्या दिवशीही जिभेचे चोचले पुरवणे सहज शक्य होईल.
1. दही-साबूदाणा
साबुदाणा पाण्यामध्ये भिजवून वापरण्यात येतो त्यामुळे याचा पोटाला त्रास होत नाही. तसेच दही पोटाला थंड ठेवण्याचे काम करते. या दोघांचेही मिश्रण तुमच्या पोटाला निरोगी ठेवण्याचे काम करतं. तुम्हीही नवरात्रीच्या उपवासासाठी दही-साबुदाणा तयार करू शकता.
दही-साबुदाणा तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य :
- साबुदाणा - 1 कप
- शेंगदाण्याचा कुट - 3 चमचे
- दही - 1 कप
- तूप - 1 चमचा
- जिरे - 2 चमचे
- हिरवी मिरची - 2 ते 3
- साखर - 1 चमचा
- सैंधव मीठ - चवीनुसार
दही साबुदाणा तयार करण्याती कृती :
- एक कप दही आणि पाणी मिक्स करून घ्या.
- त्यानंतर एका गरम कढईमध्ये 3 ते 4 मिनिटांपर्यंत साबुदाणे परतून घ्या.
- साबुदाणे परतून झाल्यानंतर दही आणि पाणी असलेल्या मिश्रणामध्ये मिक्स करून झाकून ठेवा.
- 2 ते 3 तासांनंतर झाकण उघडून बघा. मिश्रण फआर घट्ट झालं असल्यास त्यामध्ये दही आणि पाण्याचं मिश्रण पुन्हा टाकून झाकून ठेवा.
- त्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचा कूट, साखर आणि मीठ मिक्स करा.
- आता एका कढईमध्ये हिरवी मिरची आणि जीऱ्याची फोडणी घालून दह्यात भिजवलेले मिश्रण एकत्र करा.
- टेस्टी दही- साबुदाणा तयार आहे.
2. साबुदाणा पुलाव
आतापर्यंत तुम्ही आलू-साबुदाणा किंवा मटर साबुदाणा ऐकलं असेल पण या नवरात्रीसाठी तुम्ही साबुदाण्याचा पुलाव नक्की ट्राय करू शकता.
साबुदाणा पुलाव तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य :
- साबुदाणा - 1 कप
- कापलेले गाजर - 1 कप
- कापलेली फरसबी - अर्धा कप
- मटार - अर्धा कप
- हिरवी मिरची - 1 चमचा
- लवंग - 2
- वेलची - 1 ते 2
- काजू - 5
- बदाम - 2
- सैंधव मीठ
- तूप
साबुदाणा पुलाब तयार करण्याची कृती :
- बदाम आणि साबुदाणे 2 ते 3 तासांसाठी भिजत ठेवा.
- जेव्हा बदाम भिजल्यानंतर त्याची साल काढून बारिक कापून घ्या.
- एका पॅनमध्ये तूप गरम करून काजू आणि बदाम परतून घ्या.
- याच पॅनमध्ये आणखी थोडं तूप घालून लवंग आणि वेलची पावडर परतून घ्या.
- आता पॅनमध्ये भाज्या टाकून 10 ते 12 मिनिटांसाठी व्यवस्थित शिजवून घ्या.
- जेव्हा भाज्या शिजती त्यावेळी साबुदाणे पाण्यातून काढून ते पॅनमध्ये टाका.
- मीठ टाकून थोड्या वेळासाठी झाकून ठेवा.
- काजू आणि बदाम टाकून सर्व्ह करा साबुदाणा पुलाव.