आपल्या देशात सर्वच गोष्टींमध्ये विविधतेत एकता आढळून येते. आपल्यापैकी बऱ्याच जणांचं जेवण लोणचं किंवा चटणी शिवाय पूर्णच होत नाही. परंतु काही अशीही लोकं आहेत जी हे खाणं टाळतात. कारण त्यांचं असं मत असतं की, हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. तुम्हीही यामध्ये वापरण्यात येणारं तेल आणि मीठ पाहून घाबरून जात असाल तर आम्ही आज तुम्हाला या दोघांपैकी आरोग्यासाठी काय उत्तम ठरतं हे सांगणार आहोत.
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांचं असं मत आहे की, आपण सर्वांनी दररोज कमीत कमी एक चमचा लोणचं किंवा चटणी खाणं फायदेशीर ठरतं. खासकरून सॉस किंवा डिप ऐवजी चटणी हा एक आरोग्यदायी पर्याय आहे.
लोणच्यापासून दूर राहण्याची गरज नाही
तुम्हीही लोणचं तयार करताना वापरण्यात येणारं तेल आणि मीठ पाहून घाबरून जाता का? रुजुता दिवेकर यांच्या सांगण्यानुसार, यापासून वाचण्याची अजिबात गरज नसते. लोणचं फर्मेटेशनपासून तयार होतं. जेव्हा तुम्ही यामध्ये तेल आणि मीठ एकत्र करता त्यावेळी त्यामध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया वाढतात. असं होणं आपल्या आतड्यांसाठी फायदेशीर ठरतं आणि शरीरासाठी घातक ठरणारे बॅक्टेरिया संपवण्यास मदत होते. यामध्ये असलेलं मीठ पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी मदत करतं. गरज असल्यास तुम्ही साध्या मीठाऐवजी सैंधव मीठाचा वापर करू शकता. तसेच लोणचं तयार करण्यासाठी वापरण्यात येणारं मोहरीचं तेलही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
लोणचं तयार करताना वापरण्यात येणाऱ्या मुख्य पदार्थांमध्ये व्हिटॅमिन ए, बी12, सी, अॅन्टीऑक्सिडंट आणि फोलेट मुबलक प्रमाणात असतं. हे गॅस, एनीमिया आणि पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. म्हणून लोणचं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
चटणीचे फायदेही कमी नाहीत
चटणी अधिक कॅलरी असणाऱ्या डिप्स आणि सॉसच्या तुलनेत अधिक पटींनी उत्तम ठरते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, चटणी तयार करण्यासाठी ताज्या पदार्थांचा वापर करण्यात येतो. यामध्ये तेल वापरलचं जात नाही, त्यामुळे चटणी फॅट फ्री असते. यामध्ये लसूण, आलं, कांदा, कोथिंबीर यांसारख्या कंद आणि पानांचा वापर करण्यात येतो.
ताज्या पदार्थांपासून तयार करण्यात आल्यामुळे यांमध्ये अॅन्टीऑक्सिडंट होतात, जे शरीराचं अनेक समस्यांपासून रक्षण करतात. हे कच्च्या पदार्थांपासून तयार करण्यात येतात. त्यामुळे यांमध्ये अस्तित्वात असलेले एंजाइम पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत करतात.
अतिसेवन ठरतं घातक
कोणत्याही गोष्टीचं प्रमाण जास्त जालं तर ते आरोग्यासाठी घातक ठरतं. त्याचप्रमाणे चटणी आणि लोणचं मर्यादित प्रमाणात खाणचं तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं. त्यामुळे दिवसभरात एक किंवा दोन चमचे लोणचं आणि चटणी खाणं फायदेशीर ठरतं. तसेच हे तयार करतानाही जास्त तेल किंवा मीठाचा वापर करणं शक्यतो टाळा.