भारतातील 'या' राज्यांमधील ठिकाणांप्रमाणेच येथील थाळ्याही आहेत प्रसिद्ध!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 04:55 PM2018-09-20T16:55:43+5:302018-09-20T16:56:12+5:30
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. त्याचप्रमाणे येथील खाद्य पदार्थांमध्येही विविधता आढळून येते. प्रत्येक राज्यानुसार वेगवगेळी चव चाखायला मिळते. भारतातील पदार्थ फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत.
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. त्याचप्रमाणे येथील खाद्य पदार्थांमध्येही विविधता आढळून येते. प्रत्येक राज्यानुसार वेगवगेळी चव चाखायला मिळते. भारतातील पदार्थ फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. येथे प्रत्येक राज्यातील थालीमध्येही वेगवेगळ्या चवी चाखायला मिळतात. पंजाबी थाळी, गुजराती थाळी, मेघालय थाळी, साउथ इंडियन थाळी इत्यादींमध्ये वेगवेगळ्या चवी चाखायला मिळतात.
1. पंजाबी थाळी
पंजाबच्या थाळीमध्ये पालक पनीर, दाल मक्खनी, छोले भटूरे, आलू पराठा, जीरा आलू, रायता इत्यादी पदार्थ असतात. नॉन व्हेज थाळीमध्ये तंदूरी चिकन, चिकन टिक्का मसाला, रूमाली रोटी फार फेमस आहे.
2. राजस्थानी थाळी
व्हेजीटेरियन डिशमध्ये राजस्थानी थाळी फार फेमस आहे. यामध्ये दाल बाटी चुरमा, मूगाची डाळ, गाठिची भाजी (गट्टे की सब्जी), बाजरीची भाकरी आणि मक्याची रोटी इत्यादी पदार्थांचा समावेश असतो.
3. गुजराती थाळी
गुजराती थाळीमध्ये रोटी, डाळ, कढी-भात, मिठाया यांचा समावेश असतो. या थाळीला अनेकदा पसंती मिळते.
4. केरळ थाळी
केरळच्या पारंपारिक थाळीमध्ये कोकोनट मिल्क, डोसा, इडली, सांबर, केळ्याची भाजी यांसारख्या पदार्थांचा समावेश करण्यात येतो. हे सर्व पदार्थ केळ्याच्या पानांवर सर्व्ह करण्यात येतात.
5. नॉर्थ इंडियन थाळी
या थाळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा समावेश करण्यात येतो. यामध्ये कोबीची भाजी, पनीर बटर मसाला, डाळ फ्राय, डाळ मक्खनी, पुलाव, सुकी भाजी, दही, लोणचं, पापड इत्यादी पदार्थ वाढण्यात येतात.