पावसाळ्यात सर्वांना आवडणारा आणि खावासा वाटणारा पदार्थ म्हणजे, भजी. पावसाळ्यातील अल्हाददायी वातावरणामध्ये भजी खाण्याची मजा काही वेगळीच. पण अनेकदा कांदा-बटाट्याची भजी खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे या पावसाळ्यात तुम्ही नवीन भजी ट्राय करू शकता. त्यासाठी आम्ही तुम्हाला काही ऑप्शन्स सांगणार आहोत. या पावसाळ्यात तुम्ही हेल्दी आणि हटके मक्याची भजी खाऊ शकता.
सध्या पावसाळा असल्यामुळे ताजे मके तुम्हाला सहज उपलब्ध होतील. वर्षभर मके उपलब्ध असतात पण पावसाळ्याच्या वातावरणात मके खाण्याचा आनंद काही वेगळाच आहे. मक्याचा कणीस उकळून किंवा भाजून खाण्यापेक्षा तुम्ही कधीतरी भजी ट्राय केलीत तर घरची मंडळी तुफान खूश होतील. चला तर मग जाणून घेऊया कशी तयार करायची मक्याची कुरकुरीत भजी.
साहित्य :
मक्याचे चार वाटी उकलेल्या दाण्याची पेस्ट
1 बटाटा उकडलेला
ब्रेडक्रम्स
थोडं तांदळाचे पीठ
हिरव्या मिरच्या
हळद
जिरं, ओवा
मीठ
तेल
पाणी
कृती :
- मक्याच्या दाण्याची पेस्ट घेऊन त्यात कुस्करलेला बटाटा एकत्र करून घ्या.
- त्यानंतर त्यामध्ये तांदळाचं पिठ, हिरव्या मिरच्या, हळद, मीठ, जिरं, ओवा एकत्र करून घ्यावं.
- मिश्रण व्यवस्थित एकजीव करावं.
- तयार मिश्रणाचे छोटे चपटे गोळे करावे.
- हे गोळे ब्रेडक्रम्समध्ये घोळवून गरम तेलात तळावेत.
- गरमा गरम मक्याची भजी खाण्यासाठी तयार आहेत.
हे पण वाचा-
सर्दी, खोकल्यावर रामबाण उपाय १ ग्लास तुळशीचं दूध; इतर फायदे वाचून अवाक् व्हाल
अवघ्या जगाचे डोळे असलेल्या लसीची चाचणी अपूर्ण; तरीही उत्पादनाला सुरूवात?, वाचा WHO ची प्रतिक्रिया