सध्या सगळीकडे धुमधडाक्यात लग्नसराई सुरू आहे. आठवड्यातल्या एखाद्या दिवशी तरी नातेवाईक किंवा मित्र-मैत्रिणींच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी जावचं लागतं. मग लग्नामध्ये जाणं, तिथलं जेवणं जेवणं आलचं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लग्नाच्या जेवणात असलेले गोडाचे पदार्थ. आपण कितीही प्रयत्न केला तरिही या पदार्थांपासून लांब राहू शकत नाही. पण अनेकदा डाएटमुळे मनावर दगड ठेवून या पदार्थांपासून आपण स्वतःला जबरदस्तीने दूर ठेवतो. कारण जास्त गोड पदार्थांचे सेवन करणं शरीरासाठी अत्यंत नुकसानदायी ठरतं. हे सर्व खरं असलं तरिही तुम्ही जेव्हाही एखाद्या लग्नसमारंभासाठी जाता त्यावेळी गोडाच्या पदार्थांमध्ये जर रसमलाई असेल तर मात्र ती अवश्य खा. मुळची ओडीशाची असलेली ही मिठाई शरीरासाठी अत्यंत गुणकारी ठरते. जाणून घेऊया रसमलाईला लग्नाच्या जेवणातील हेल्दी डेझर्ट म्हणून का ओळखलं जातं त्याबाबत...
'हे' पदार्थ रसमलाईला बनवतात हेल्दी डेझर्ट :
- रसमलाई स्पॉन्जी पनीर म्हणजेच इंडियन कॉटेज चीजपासून तयार होते.
- ही थिक रिड्यूस्ड मिल्क आणि क्लॉटेड क्रिममध्ये भिजवून ठेवण्यात येते.
- रसमलाईला पिस्ता, बदाम, केशर आणि इतर अन्य ड्राय फ्रुट्सचा वापर करून सजवण्यात येते.
- कॉटेज चीज म्हणजेच पनीरमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन्स असतात. जे आरोग्यासाठी गुणकारी ठरतात.
- ड्राय फ्रुट्समध्ये अॅन्टी-ऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे अनेक आजारांपासून आरोग्याचे रक्षण होण्यास मदत होते.
- दूधामध्ये कॅल्शिअम आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात असतात.
- रसमलाई तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व पदार्थांमध्ये आरोग्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या पदार्थांचा वापर करण्यात येतो. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.
केशरही ठरतं फायदेशीर
रसमलाईमध्ये वापरण्यात येणारा एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे केशर. केशर आपल्या शरीरामध्ये कॅन्सरला कारण ठरणाऱ्या पेशींचा वाढ होण्यापासून थांबवतं. तसेच कॅन्सरला कारण ठरणाऱ्या पेशीं नष्ट करण्यासाठीही परिणामकारक ठरतं.
डिप फ्राय नसते रसमलाई
रसमालाई हेल्दी असण्याचं आणखी एक कारण म्हणजे, ती डीप फ्राय केलेली नसते. यामध्ये मीठ, साखर फार कमी प्रमाणात वापरण्यात येते. यामध्ये कॅल्शियम , प्रोटीन आणि मिनरल्स फार कमी प्रमाणात असते. तसेच डायबिटीज पेशंटसाठीही रसमलाई खाणं फायदेशीर ठरतं.