सध्या बाजारामध्ये आंब्यांची आवाक वाढलेली आहे. तसेच घरामध्येही आंब्यापासून तयार करण्यात आलेले पदार्थांची रेलचेल सुरू झाली आहे. अनेकजण आंबा उष्ण असल्यामुळे खाण्याचं टाळतात. परंतु आंबा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. आंब्यापासून तुम्ही मँगो मिल्कशेक, मँग लस्सी, मँगो शिरा यांसारखे अनेक पदार्थ तयार करू शकता. अशातच आज आम्ही तुम्हाला आंब्यापासून तयार होणारी एक हटके रेसिपी सांगणार आहोत. जाणून घेऊया मँगो आइस्क्रिम तयार करण्याची रेसिपी....
आंबा तर आपल्याला सर्वांनाच आवडतो. लहानांपासून थोरामोठयांपर्यंत सर्वच आंब्याच आतुरतेने वाट पाहात असतात. आंबा जेवढा स्वादिष्ट असतो, तेवढाच तो त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी उपयोगी ठरतो. आंबा कच्चा असो किंवा पिकलेला, शरीरासाठी फायदेशीरचं ठरतो. उन्हाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या अनेक समस्यांपासून बचाव करण्यासाठी आंबा मदत करतो.
साहित्य :
- आंबा
- फ्रेश क्रिम
- साखर
- व्हेनिला एसेंस
साहित्य :
- सर्वात आधी आंब्याची साल काढून त्याचा पल्प काढून घ्या.
- आंब्याचा पल्प मिक्सरमध्ये टाकून त्याची पेस्ट तयार करा.
- बाउलमध्ये काढून त्यामध्ये साखर आणि व्हेनिला एसेंस एकत्र करा.
- क्रिम ब्लेंड करा आणि त्यानंतर आंब्याची पेस्ट एकत्र करून पुन्हा 3 ते 5 मिनिटांसाठी ब्लेंड करा.
- तयार मिश्रण कंटेनरमध्ये काढून 7 ते 8 तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवा.
- फ्रिजमधून तयार मँगो आइस्क्रिम काढून ड्रायफ्रुट्सने गार्निश करा.
- फ्रेश आणि होममेड मँगो आइस्क्रिम तयार आहे.