आपण अनेकदा काहीतरी हटके पदार्थ तयार करण्याच्या विचारात असतो. अशावेळी तुम्ही पराठा ट्राय करू शकता. त्यामध्ये प्रामुख्याने बटाट्याचा पराठा, कोबीचा पराठा यांचा समावेश होतो. पण तुम्ही कधी पालक पराठा तयार केला आहे का? पालक पराठा हा घरच्या घरी अगदी सहज तयार करता येणारा पदार्थ असून एक इंडियन ब्रेकफास्ट रेसिपी आहे. जो पालकची भाजी आणि काही मसाले एकत्र करून तयार करण्यात येतो. पालकमध्ये आयर्न, झिंक मुबलक प्रमाणात आढळून येतं. ज्यामुळे हा पराठा टेस्टी असण्यासोबतच हेल्दीही असतो. हा पराठा तयार करण्यासाठी फार वेळ लागत नाही. हा हेल्दी नॉर्थ इंडियन पदार्थ स्कूल टिफिन, रोडट्रिप आणि पिकनिकसाठी तयार करू शकता.
साहित्य :
- 1 कप गव्हाचं पिठ
- 1/4 टीस्पून हळदीची पावडर
- मीठ चवीनुसार
- ½ टीस्पून ओवा
- 1 बारीक चिरलेला कांदा
- ¾ कप बारिक चिरलेली पालक
- 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
- 1 टीस्पून जीरं
- 1 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
- 2 टेबलस्पून बटर
कृती :
- पालक पराठा एक सहज तयार करता येणारी रेसिपी आहे. त्यासाठी सर्वात आधी पालक धुवून घ्या. त्यानंतर त्यातील एक्स्ट्रा पाणी काढून टाका.
- जर तुम्ही हे आणखी हेल्दी आणि पचण्यास हलकी असणारा पदार्थ म्हणून तयार करणार असाल तर सर्वात आधी पालक उकळून घ्या. त्यानंतर पाणी गाळून बाजूला ठेवा. मिश्रण एकजीव करण्यासाठी याच पाण्याचा वापर करा. त्यामुळे भाजीतील पोषक तत्व शरीराला मिळण्यास मदत होईल. - आता एका बाऊलमध्ये पालक, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि मीठ एकत्र करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये गव्हाचं पिठ आणि इतर सर्व साहित्य एकत्र करा. सर्व मिश्रण पिठाप्रमाणे व्यवस्थित एकजीव करून मळून घ्या.
- त्यानंतर तयार पिठाच्या छोटे-छोटे गोळे तयार करून चपातीप्रमाणे लाटून घ्या.
- एक पॅन गरम करून त्यावर तेल किंवा तूप टाका.
- आता गरम पॅनवर पराठा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्या.
- पराठा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजल्यानंतर प्लेटमध्ये काढून सर्व्ह करा.