पनीर म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. हॉटेलमध्ये गेल्यानंतर पहिली पसंती पनीरपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांना देण्यात येते. त्यातल्या त्यात पनीर टिक्का म्हटलं की, सर्वांच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही. हा पदार्थ पनीर क्यूब्स मॅरिनेटेड पनीर क्यूब भाजून करण्यात येतं. त्यामुळे पनीरला एक स्मोकी आणि क्रिस्पी फ्लेवर येतो. तुम्ही मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा जेवताना थोडा वेगळा बेत म्हणून पनीर टिक्का तयार करू शकता.
साहित्य :
- 250 ग्रॅम क्यूब्ड पनीर
- 4 चमचे बेसन
- 1 चमचा ओवा
- 1 चमचा हळद
- 1 चमचा गरम मसाला पावडर
- अर्धा चमचा कश्मीरी पावडर
- 1 चमचा लिंबाचा रस
- 1 चमचा आलं लसणाची पेस्ट
- 3 चमचे तेल
- मीठ चवीनुसार
- पाणी
कृती :
- सर्वात आधी एका बाउलमध्ये बेसन, ओवा, हळद, गरम मसाला पावडर, कश्मीरी पावडर, लिंबाचा रस, आलं लसणाची पेस्ट, मीठ आणि पाणी टाकून मिश्रण एकत्र करून घ्या.
- त्यानंतर त्या मिश्रणामध्ये पनीरचे तुकडे घोळून घ्या. - एका कढईमध्ये 3 चमचे तेल घ्या. तेल गरम झाल्यानंतर पनीरचे तुकडे त्यामध्ये तळून घ्या.
- सर्व पनीरचे तुकडे तळून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या.
- पनीरच्या तुकड्यांवर चाट मसाला टाका.
- वरून बारिक चिरलेली कोथिंबीर टाका.
- पुदिन्याच्या चटणीसोबत गरमा गरम पनीर टिक्का सर्व्ह करा.