पुणे : उपवास असल्यावर ठराविक पदार्थ वापरून स्वयंपाक करण्याची कसरत साधावी लागते. अशावेळी कमीत कमी पदार्थ वापरून चवदार पदार्थ बनवता येऊ शकतात. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे आलू चाट. चटपटीत आणि कमीत कमी पदार्थ वापरून केला जाणारा आलू चाट पोटभरीचे अन्न म्हणूनही खाण्यासारखे आहे.
साहित्य :
तीन ते चार मोठे उकडलेले बटाटे
बारीक वाटलेली मिरची
दही २५० ग्रॅम
कोथिंबीर (चालत असल्यास)
जिरे पूड
बटाटा शेव किंवा चिवडा
लाल तिखट
साखर
मीठ
तूप
कृती :
- उकडलेल्या बटाट्यात मीठ, जिरेपूड आणि हिरव्या मिरचीचा ठेचा एकत्रित करून त्याची टिक्की करून घ्यावी.
- या टिक्की तासभर डीप फ्रीझ करून ठेवाव्यात आणि नंतर तुपात शॅलो फ्राय करून घ्याव्यात.
- मोठ्या वाटीत घट्ट दही, साखर, मीठ एकत्र करून एकजीव करून घ्यावे. त्यात आलू टिक्की घालावी.
- त्यावर लाल तिखट, उपवासाची शेव किंवा चिवडा भुरभुरावा. चालत असेल त्यावर कोथिंबीर चिरून टाकावी.
- ही टिक्की पोटभरीची म्हणून पण खाता येते. आधी टिक्की डीप फ्रीझ करून ठेवली तरी ऐनवेळी करता येऊ शकते.