हिवाळ्यामध्ये शरीराची अधिक काळजी घेणं गरजेचं असतं. त्यासाठी आहारामध्ये काही खास पदार्थांचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. या ऋतुमध्ये ड्रायफ्रुट्स खाणं उपयुक्त ठरतं. जर तुम्हाला फक्त ड्रायफ्रुट्स खाणं शक्य नसेल तर तुम्ही ड्रायफ्रुट्स हलवा तयार करून खाऊ शकता. खाण्यासाठी फार चविष्ट आणि आरोग्यासाठीहीआरोग्यदायी असा हा पदार्थ नक्की ट्राय करू शकता. आज अशीच एक चविष्ट रेसिपी तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घेऊया अंजिरचा हलवा तयार करण्याची रेसिपी...
साहित्य :
- 200 ग्रॅम सुकवलेले अंजीर
- तूप
- अर्धा कप बदामांची पावडर
- मिल्क पावडर
- 4 मोठे चमचे साखर
- वेलची पावडर
कृती :
- अंजीर उकळत्या पाण्यामध्ये 3 ते 5 मिनिटांसाठी शिजवून घ्या.
- पाण्यातून काढून त्याचे तुकडे करून घ्या.
- एका कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये बदामाची पावडर मंद आचेवर भाजून घ्या.
- त्यामध्ये कुस्करलेले अंजीर, मिल्क पावडर, अर्धा कप पाणी आणि साखर एकत्र करा.
- जवळपास पाच मिनिटांपर्यंत शिजवून घ्या.
- त्यानंतर त्यामध्ये वेलची पूड घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या.
- गरम गरम अंजिरचा हलवा खाण्यासाठी तयार आहे.