उन्हाळा सुरू झालाय याची जाणीव बाजारात कैऱ्या दिसायला लागल्यावर होते. चैत्र महिना हा तर कैरी खाण्याचा हक्काचा महिना, असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. अशातच बाजारात कैऱ्यांची आवाक् सुरू झाली की, घरातही कैरीपासून तयार होणाऱ्या पदार्थांची रेलचेल वाढते. अशातच हळदीकुंकवासाठी कैरी वापरून तयार केलेली आंबेडाळ आणि पन्हं तसेच प्रत्येकाला हवहवसं वाटणारं चटपटीत लोणंचीही तयार केली जातात.
आंबा जसे सर्वांचे आवडते फळ आहे तसेच कैरीही अनेकांना आवडते. जेवणासोबत कैरी खाण्याची तर एक वेगळीच मजा असते. कैरी फक्त खाण्यासाठीच चांगली लागत नाही तर कैरीचे आरोग्यदायी फायदेसुध्दा आहेत. पिंपल्स, उष्मघात, अपचनाची समस्यां यासाठी कैरी एक उपयोगी ठरते. अशतच आज आम्ही कैरीपासून तयार होणारी एक हटके रेसिपी सां
साहित्य :
- कैरी
- कांदा
- पुदिना
- जीरा
- गुळ
- लाल मिरची
- मीठ
कृती :
- कैरी आणि कांदा छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्या. - त्यानंतर हे मिक्सरमध्ये एकत्र करून वाटून घ्या. - चवीनुसार त्यामध्ये मीठ, मिरची आणि गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. - तुमची चटपटीत कैरीची चटणी तयार आहे.
फायदे :
- कैरीच्या चटणीच्या सेवनाने व्हिटॅमिन-सी, ए आणि बी मुबलक प्रमाणात शरीराला मिळतं.
- यामुळे उन्हाळ्याच्या दुषपरिणामांपासून सुटका होते.
- ह रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आणि नवीन पेशी तयार करण्यासाठी मदत करते.
- पोट आणि पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करते.