बर्फी म्हटलं की, सर्वांच्या तोंडी नाव येतं ते म्हणजे काजू कतलीचं. प्रत्येकाला आवडणारी ही काजू कतली उत्तर भारतातील प्रसिद्ध मिठाई आहे. एखाद्या समारंभासाठी किंवा फेस्टिव्ह सिझनसाठी अनेकदा काजू कतली घरी आणण्यात येते. परंतु तुम्हाला माहीत आहे का? बाजारातून काजू कतली विकत आणण्याऐवजी तुम्ही घरीच काजू कतली तयार करू शकता. जाणून घेऊया काजू कतली तयार करण्याची रेसिपी...
साहित्य :
- काजूची पावडर 2 कप
- तूप 2 चमचे
- अर्धा कप पाणी
- चांदीचा वर्ख
- साखर एक कप
- दूध 2 चमचे
कृती :
- सर्वात आधी काजू मिक्सरमध्ये बारिक करून स्मूथ पावडर तयार करून घ्या.
- काजूची पेस्ट तयार करण्यासाठी मध्यम आचेवर एक पॅन ठेवा आणि त्यामध्ये पाणी गरम करा. त्यानंतर त्यामध्ये साखर टाकून पुर्णपणे विरघळवून घ्या.
- साखरेचा पाक तयार झाल्यानंतर त्यामध्ये काजूची पावडर टाका आणि व्यवस्थित एकत्र करा.
- हे मिश्रण 5 ते 10 मिनिटं एकत्र केल्यानंतर घट्ट होऊ लागेल. त्यानंतर लगेच गॅस बंद करा.
- तयार काजूची पेस्ट एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि थोडं थंड झाल्यानंतर हाताने त्याचा एक गोळा तयार करून लाटण्याच्या मदतीने लाटून घ्या. एका प्लेटला तूप लावून त्यामध्ये लाटलेलं मिश्रण टाका.
- पूर्णपणे थंड झाल्यानंतर डायमंड शेपमध्ये कापून घ्या.
- गोड गोड काजू कतली खाण्यासाठी तयार आहे.