बऱ्याचदा नाश्त्याला किंवा जेवणामध्ये तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अशातच खाहीतरी वेगळं पण हेल्दी पदार्थाच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला एक नवीन रेसिपी सांगणार आहोत. आज पाहुयात कोथिंबीरीचं धिरडं तयार करण्याची रेसिपी. नाव काहीसं ऐकल्यासारखं वाटतं असेल ना? फार पूर्वीपासूनचं धिरडं तयार करण्यात येतं. धिरडं वेगवेगळ्या पद्धतीन तयार केलं जातं. चण्याच्या पिठाचं, ज्वारीच्या पिठाचं किंवा पिठामध्ये एखादा पदार्थ मिक्स करून हे धिरडं तयार करण्यात येतं.
साहित्य :
- एक वाटी ज्वारीचे पीठ
- अर्धी वाटी बेसन
- एक मोठा चमचा रवा
- दोन वाटय़ा चिरलेली कोथिंबीर
- अर्धी वाटी ताक
- अर्धी वाटी पाणी
- थोडं लाल तिखट
- अर्धा चमचा जीरं
- मीठ चवीनुसार
कृती :
- धिरंड करण्यासाठी बीडचा किंवा जाड लोखंडाचा तवा गॅसवर गरम करत ठेवावा.
- वरील सर्व साहित्य एकत्र करुन घ्या.
- तवा गरम झाला की तव्याला तेल लावून घ्या. जेणेकरुन धिरडं तव्याला चिकटणार नाही.
- तयार मिश्रण तव्यावर पसरवून किंचित तेल सोडून झाकण ठेवा.
- धिरडं उलटून नीट भाजून घ्या.
- गरम गरम कोथिंबीरीचं धिरंड खाण्यासाठी तयार आहे.