कदाचितच असं कोणी असेल ज्या आंबा आवडत नाही. सध्या आंब्याचं सीझन सुरू असून बाजारातही फळांच्या राजाची आवाक वाढली आहे. एवढचं नाही तर घराघरात याचे आगमन झाले असून त्यापासून तयार करण्यात येणाऱ्या पदार्थांची घराघरांमध्ये रेलचेल सुरू झाली आहे. अनेक लोक आंबा कापून खाणं किंवा मिल्कशेक पिणं पसंत करतात. यामध्ये कधीकधी मँगो आइस्क्रिम किंवा कुल्फी. परंतु आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आंब्यापासून लाडू तयार करण्याची रेसिपी... रोजच्याच पदार्थांपासून थोडेसा वेगळा आणि हटके पदार्था खाण्यासाठीही चविष्ट ठरतो.
साहित्य :
- आंब्याचा रस
- जाडसर बारिक केलेले बेसन
- पिठीसाखर
- तूप
- मलई
- रवा
- वेलची पावडर
- ड्राय फ्रूट्स
कृती :
- सर्वात आधी कढईमध्ये तूप वितळवून बेसन आणि रवा एकत्र करून मंद आचेवर भाजून घ्या.
- बेसन आणि रवा तोपर्यंत एकत्र भाजून घ्या जोपर्यंत हलका गुलाबी रंगाचं होईपर्यंत भाजून घ्या.
- आता या मिश्रणामध्ये आंब्याचा रस हळूहळू एकत्र करा. सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करा.
- जवळपास अर्धा तास ठेवल्यानंतर मिश्रण थोडसं फुललेलं दिसेल.
- आता हे मंद आचेवर ठेवून पाच मिनिटांसाठी भाजून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये मलई एकत्र करा.
- जेव्हा मिश्रण व्यवस्थित एकत्र होईल त्यानंतर गॅस बंद करा. त्यानंतर त्यामध्ये बारिक तुकडे केलेले काजू-बदाम, मणूके एकत्र करून झाकून ठेवा.
- मिश्रण थंड झाल्यानंतर पिठीसाखर, वेलची एकत्र करा आणि त्याचे गोल लाडू तयार करून घ्या.
- आता आंब्याचे हे लाडू सर्व्ह करा.
आंब्याचे फायदे :
आंब्यात व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम, कॉपर, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, जिंक सेलेनियम आणि फॉस्फरस सारखे मिनरल्सही असतात. आंब्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. त्यासोबतच त्वचेच्या अनेक समस्याही आंब्यामुळे दूर होतात. याशिवाय आंबा वजन आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, कॅन्सरपासून सुटका करण्यासाठी, त्वचा आणि डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी, स्मरणशक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतो.