पुणे :अचानक पाहुणे येणार असतील किंवा मुलांना काहीतरी चटपटीत खायचं असेल तर हा पदार्थ नक्कीच चांगला पर्याय आहे. अतिशय पौष्टिक, चवदार आणि करायला सोपा पदार्थ आवर्जून करून बघा.
साहित्य : दोन वाट्या तांदूळ
अर्धा वाटी दही
एक वाटी पालक
एक कांदा बारीक चिरून
एक टोमॅटो बारीक चिरून
अर्धी वाटी सोया चंक्स
आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा एक चमचा
व्हेज बिर्याणी मसाला
तेल किंवा तूप आवडीनुसार
काजू तळलेले (आवडत असतील तर)
मीठ
पाणी
कृती : १. सोया चंक्स पाण्यात उकळून घ्या, दहा मिनिटांनी थंड पाण्याने धुवून त्यातले पाणी पिळून घ्या.२. कुकरमध्ये तेल गरम करून उभा चिरलेला कांदा आणि टोमॅटो थोडे शिजवून घ्या.३. त्यात आले, लसूण आणि मिरचीची पेस्ट घाला.
४. कुकरमधील फोडणीत आता धुवून घेतलेले तांदूळ टाकून परता आणि त्यात वाटीभर पालकची पेस्ट घाला. ५. आता पेस्ट आटत आल्यावर त्यात चमचाभर बिर्याणी मसाला घाला. त्यात दोन चमचे घट्ट दही घाला.
६. शेवटी पावणेदोन वाट्या उकळलेले पाणी घाला. या पाण्यात आवडत असल्यास दोन चमचे तूप घाला.
७. दोन शिट्ट्या घ्या आणि गॅस बंद करा. कुकर गार झाल्यावर काजूच्या तुकड्यांसह सर्व्ह करा पालक सोया पुलाव.
८. रायते किंवा कोशिंबीरीसोबत उत्तम हा पुलाव उत्तम लागतो. डब्यात देऊन थंडही खाऊ शकतो.