अनेकदा रोजच्याच पदार्थांचा कंटाळा येतो आणि काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. अशातच मग आपण अनेकदा बाहेरून काहीतरी ऑर्डर करतो. पण अशावेळी तुम्ही घरीच काहीतरी झटपट तयार करून खाऊ शकता. आज अशाच काहीशा झटपट तयार होणाऱ्या पदार्थाची रेसिपी सांगणार आहोत. झटपट तयार होणारा आणि पार्टीच्या मूडप्रमाणे सर्वांना चाखता येणारा हा पदार्थ घरातील थोरामोठ्यांप्रमाणे लहान मुलांनाही आवडेल.
साहित्य :
- गोलाकार चिरलेल्या कांद्याच्या चकत्या
- चीज स्लाइस
- मैदा
- कॉर्नफिल्क्स
- बेडक्रम्स
- कॉर्नफ्लॉवर
- कोथिंबिर
- तेल
कृती :
कांदा गोलाकार चिरून त्याच्या चकत्या कराव्या.
चीजचे पातळ उभे काप करून ते कांद्याच्या गोलाकार जागेत भरावे.
चीजच्या बाहेरील बाजूस पुन्हा कांद्याची चकती ठेवावी.
एका बाऊलमध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, तिखट एकत्र करावं.
गरजेप्रमाणे थोडंथोडं पाणी घालून मिश्रण तयार करावे. कोथिंबीर बारिक चिरून त्या मिश्रणामध्ये एकत्र करावी.
दुसऱ्या ताटात बेडक्रम्स, कॉर्नफ्लेक्सचा चुरा, मीठ आणि कोशिंबीर एकत्र करून घ्यावी.
एक रिंग घेऊन मैद्याच्या मिश्रणात घोळून नंतर तिच रिंग ब्रेडक्रम्समध्ये घोळावी.
पुन्हा मैद्याचे मिश्रण आणि ब्रेडक्रम्समध्ये घोळून सर्व रिंग्स तयार करून घ्याव्यात.
रिंग्स तयार झाल्यानंतर फ्रिजमध्ये सुमारे अर्धातास ठेवावी. त्यानंतर त्या रिंग्स तेलात तळून घ्याव्या.
गरम गरम ओनियन रिंग्ज खाण्यासाठी तयार आहेत.
चटणी किंवा शेजान सॉससोबत सर्व्ह कराव्या ओनियन रिंग्ज