Papaya For Weight Loss: पिकलेली पपई आरोग्यासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर असते. पपईच्या सेवनाने शरीराला भरपूर फायबर मिळतं. पपई हे एक लो कॅलरी फळ आहे. तसेच यात व्हिटॅमिन सी आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स आढळतात. तसेच यात पपॅन नावाचं एक तत्व असतं जे पचन तंत्रासाठी खूप फायदेशीर असतं. महत्वाची बाब म्हणजे पपईच्या सेवनाने पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. ज्यामुळे तुम्ही जास्त खात नाहीत, याने वजन कमी करण्यास मदत मिळते. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल आणि पोट बाहेर निघालं असेल तर पपई खाण्याचे फायदे जाणून घ्या.
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी पपई
मॉर्निंग स्नॅकसारखी खा
वजन कमी करण्यासाठी पपईचं तुम्ही सकाळी नाश्त्यात सेवन करू शकता. सकाळी एक प्लेट पपई कापून खावी. याने मेटाबॉलिज्म बूस्ट होईल आणि दिवसभर फॅट बर्निंग प्रोसेस सुरू राहील.
स्मूदी
नाश्त्यामध्ये जर पपई खाण्याची ईच्छा नसेल तर तुम्ही पपईची स्मूदी पिऊ शकता. पपईची स्मूदी तयार करण्यासाठी पपई कापून एक पाणी किंवा दुधासोबत ब्लेंड करा. या स्मूदीचा प्रभाव वाढवण्यासाठी यात अळशीच्या बीया किंवा चीया सीड्स टाकू शकता. या बीया टाकल्याने फायबरचं प्रमाण वाढतं. याने पोट जास्त वेळ भरलेलं राहतं.
पपई आणि पदीन्याचा ज्यूस
वजन कमी करण्यासाठी पपई आणि पदीन्याचा ज्यूस बनवून पिऊ शकता. हे ड्रिंक प्यायल्याने पचन तंत्राला फायदे मिळतात. पपई बारीक कापा आणि त्यात पदीना टाकून ब्लेंड करा. या दोन्ही गोष्टी एकत्र करून प्यायल्याने पचन चांगलं होतं. ज्यामुळे कमी करण्यास मदत मिळते.
सलाद म्हणून खा
पपई सलाद बनवण्यासाठी देखील एक चांगलं फळ आहे. हिरव्या पालेभाज्या, काकडी आणि लिंबाचा रस टाकून पपईचे तुकडे टाका. पपईचा हा सलाद जेवणासोबतही खाऊ शकता.
सायंकाळी खा
दिवसातील तीन मुख्य जेवणाच्या मधल्या वेळेतही काहीना काही खाता येतं. अशात तुम्ही सायंकाळी पपई खाऊ शकता. पपई कापून सायंकाळी किंवा डिनरच्या आधी खाऊ शकता. याने पोट भरलं राहतं आणि तुमचं अनावश्यक खाणं टाळलं जातं.
किती पपई खावी?
हे तर तुम्हाला माहीत असेलच की, कोणत्याही गोष्टीची अति वाईट असते आणि पपईबाबतही हे लागू पडतं. पपई सुद्धा प्रमाणात खाल्ली पाहिजे. जास्त पपई खाल्ल्याने पोट बिघडू शकतं किंवा फायबर पोटात जास्त गेल्याने पोटात दुखू शकतं. त्यामुळे एकावेळी एक प्लेट पपई तुम्ही खाऊ शकता.