Right Way To Make Kadhi : भारतीय जेवणामध्ये कढी फारच फेमस आहे. खूपसारे लोक दह्याच्या कढीचं सेवन करतात. बरेच लोक दह्याची कढी बनवताना त्यात बेसन टाकतात. पण जास्तीत जास्त लोक कढी तयार करताना एक कॉमन चूक करतात. ज्यामुळे कढीची टेस्टही बदलते आणि टेक्सचरही खराब होतं. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कढीमध्ये तुम्ही मीठ कधी टाकावं. जेणेकरून टेस्ट आणि टेक्सचरही खराब होतं.
कढीत कधी टाकावं मीठ
कढी ही दह्याची किंवा ताकाची बनवली जाते. यात बेसनाचाही वापर होतो. जर कढीमध्ये सुरूवातीलाच मीठ टाकलं तर यामुळे कढी फाटू शकते आणि याचं टेक्सचर बिघडतं. जर कढी फाटू द्यायची नसेल तर त्यात मीठ कढीला उकडी आल्यावर 10 ते 15 मिनिटांनी मीठ टाकावं. हे करत असताना गॅसची पावर कमी करावी. असं केल्याने कढी अजिबात फाटणार नाही आणि याची टेस्टही चांगली लागेल.
कशी बनवाल कढी?
- कढी तयार करण्यासाठी एक वाट्यामध्ये दही फेटून घ्या, त्यात बेसन टाका आणि पुन्हा चांगलं मिक्स करा.
- यात हळद पावडर, लाल तिखट आणि मीठ टाता. हे चांगलं मिक्स करा. नंतर यात हळूहळू पाणी टाका. हे मिश्रण चांगलं मुलायम होईपर्यंत फेटा.
- दह्याचं मिश्रण एका कढईत किंवा पातेल्यात टाका. यावेळी गॅसची आस कमी ठेवा.
- दह्याच्या मिश्रणाला उकडी आली की, गॅस कमी करा आणि ते 20 मिनिटे उकडू द्या. अधून मधून त्यात चमचा फिरवा.
- त्यानंतर एका छोट्या पॅनमध्ये कमी आसेवर तेल किंवा तूप गरम करा. त्यात जिरे, राई आणि मेथीचे दाणे टाका.
- नंतर त्यात चिमुटभर हींग, वाळलेली लाल मिरची, कढीपत्ता, बारीक केलेलं आलं, कापलेला लसूण आणि कापलेली हिरवी मिरची टाका. हे चांगलं परतवून घ्या.
- तडका चांगला झाल्यावर त्यात दह्याचं मिश्रण टाका. कढीला उकडी आल्यावर गॅस बंद करा.