प्रत्येकाचीच इच्छा असते की, आपली बॉडि आणि फिगर परफेक्ट असावी. हेल्दी, आकर्षक आणि फिट दिसण्यासाठी आपल्या फिटनेसकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक असतं. यासाठी अनेक उपाय केले जातात. कधी स्ट्रीक्ट डाएट तर कधी एक्सरसाइज रूटिन, कधी बाजारात मिळणारी औषधं तर कधी घरगुती उपाय... आज आम्ही तुम्हाला असा एख उपाय सांगणार आहोत, जो तुम्ही घरी अगदी सहज करू शकता आणि तुमचं वाढणारं वजन रोखू शकता. यासाठी तुम्हाला फार कष्टही घेण्याची गरज नाही. तुम्हाला एक होममेड सलाड खावं लागेल. काही दिवस आपल्या डेली डाएटमध्ये हे सलाड समाविष्ट करा आणि पाहा कमाल...
जाणून घेऊया वेट लॉस सलाडची रेसिपी...
फ्रुट सलाड
फ्रुट सलाड एक अशी रेसिपी आहे, जी फार हेल्दी असते. तसेच यामध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन्स यांसारखी अनेक पोषक तत्त्व असतात. अनेकदा वेट लॉस डाएटमध्ये फळांचा समावेश करण्याचा सल्ला देण्यात येतो. अशातच फ्रुट सलाडही वेट लॉस डाएटमध्ये अत्यंत फायदेशीर ठरतं.
साहित्य :
- सफरचंद (सर्व फळांच्या फोडी करणं)
- डाळिंब
- अननस
- स्ट्रॉबेरी
- फॅट्स नसलेलं दही
कृती :
- वर सांगण्यात आलेलं सर्व साहित्य एका बाउलमध्ये एकत्र करून घ्या.
- तुम्ही यामध्ये पिस्ता, अक्रोड, बदाम यांपैकी कोणत्याही ड्रायफ्रुट्सचा वापर करू शकता.
- एका तासासाठी फ्रिजमध्ये ठेवा आणि त्यानंतर सहज सोपी सलाड रेसिपीचा डाएटमध्ये समावेश करा.
चण्याचं सलाड
चण्यामध्ये प्रोटीन, मॅगनिज आणि डायट्री फायबर असतं. जे दुपारच्या लंचसाठी अत्यंत उत्तम ठरतं. जाणून घेऊया चण्याचं सलाड तयार करण्याची रेसिपी...
साहित्य :
- उकडलेले चणे
- छोट्या तुकड्यांमध्ये कापलेली काकडी
- कांदा
- टोमॅटो
- कोथिंबीरीची चटणी
- लिंबाचा रस
- काळई मिरी पावडर
- जीरा पावडर
कृती :
- चणे उकडल्यानंतर एका बाउलमध्ये ठेवा.
- आता यामध्ये लिंबू आणि चटणी व्यवस्थित एकत्र करून घ्या.
- आता मिश्रणामध्ये काळी मिरी पावडर आणि जिरा पावडर चवीनुसार एकत्र करा. त्यामध्ये बारिक चिरलेली कोथिंबीर एकत्र करा.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत फायदेशीर ठरतं.