हिवाळ्यात आवडीने खाल्लं जाणारं फळ म्हणजे चिक्कू. लहान असोत वा मोठे सर्वांना चिक्कू खाणं आवडतं. इतकंच काय तर अनेकजण चिक्कूचा ज्यूसही घेतात. चवीला गोड असण्यासोबतच चिक्कूचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पण हे फळ खाण्याऱ्या लोकांनाच याचे फायदे माहीत नसतात. खासकरुन हिवाळ्यात चिक्कूचा आहारात समावेश करणे अधिक फायद्याचे ठरते. कारण चिक्कू खाल्ल्याने अग्नाशय मजबूत होतं, तसेच याने इम्यूनिटी सिस्टीमही चांगलं होतं. त्यासोबतच चिक्कूमध्ये व्हिटॅमिन सी आढळतं जे बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करतं. चला जाणून घेऊ याचे आणखी काही फायदे....
पचनक्रिया चांगली होते
हे तर आपणा सर्वांनाच माहीत आहे की, फायबर भरपूर प्रमाणात असलेल्या फळांनी पचनक्रिया चांगली होते. याने आतड्याही चांगल्या राहतात. चिक्कूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळतं, ज्याचा वापर वेगवेगळ्या प्रकारची औषधे तयार करण्यासाठीही केला जातो. तसेच चिक्कू खाल्ल्याने पोटाची समस्याही दूर होते.
पोटाशी संबंधित समस्या दूर होते
चिक्कूमध्ये टॅनिनचं प्रमाण अधिक असतं, हे अॅंटी-इंफ्लामेटरी एजंटसारखं काम करतं. ज्यामुळे पोटाशी संबंधित आणि आतड्यांशी निगडीत समस्या जसे की, esophagitis, enteritis, irritable bowel syndrome, and gastritis यांपासून बचाव केला जाऊ शकतो. त्यामुळे इथून पुढे कधीही पोटाची समस्या झाली तर चिक्कू खायला विसरु नका.
सर्दी-पळसाही होतो दूर
थंडीच्या दिवसात जास्तीत जास्त लोकांना सर्दी-पळस्याची समस्या असते. अशावेळी चिक्कू खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतं. चिक्कू खाल्ल्याने छातीत अडकलेला कफ नाकावाटे बाहेर पडतो. याने तुम्हाला लगेच आराम मिळू शकतो. अनेकांचा असा समज असतो की, हे फळ थंड असल्याने याने सर्दी होते, पण हा समज चुकीचा आहे. या फळामुळे सर्दी बरी होते.
हाडे होतात मजबूत
हाडांच्या मजबूतीसाठी सर्वात जास्त गरजेचे असतात ते कॅल्शिअम, फॉस्फोरस आणि आयर्नसारखे मिनरल्स. चिक्कूमध्ये हे सर्व मिनरल्स आढळतात. त्यामुळे हाडे मजबूत करण्यासाठी तुम्ही आजच चिक्कूचं सेवन करायला सुरुवात करा. लहान मुलांना हे फळ जास्तीत जास्त खायला द्यायला हवं, जेणेकरुन त्यांच्या हाडांचा विकास चांगला होईल.
अॅंटी-ऑक्सिडेंट
चिक्कूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोषक तत्वे असतात. व्हिटॅंमिन ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी यात अधिक प्रमाणात असतात. जर तुम्ही नियमीत चिक्कू खाल्ले तर तुमची त्वचा हेल्दी आणि मॉइश्चराइज होईल. अॅंटी-ऑक्सिडेंट असल्या कारणाने या फळामुळे त्वचेवर होणाऱ्या सुरकुत्यांपासूनही बचाव होणार आहे. त्यासोबतच हे फळ खाल्ल्याने केसही मुलायम होतात आणि केसगळतीही थांबते. त्यामुळे हे फळ जास्तीत जास्त खावे.