>> अंजली पाटील
शेंगदाणा कतली रोल
साहित्य-
दोन कप शेंगदाणे,अर्धा कप साखर ,अर्धा कप पाणी,दोन चमचे मिल्क पावडर,एक चमचा तूप आणि वेलचीपूड.
कृती-
>> सर्वप्रथम मंद आचेवर शेंगदाणे भाजून थंड होण्यास ठेवून द्यावे.
>> मग शेंगदाण्याची सालं काढून मिक्सरवर बारीक पावडर करून घ्यावी व ती चाळणीने चाळून घ्यावी.
>> मग गॅसवर एका कढईत अर्धा कप साखर,अर्धा कप पाणी टाकून छान मिक्स करायचं,साखर विरघळली की त्यात शेंगदाण्याची बारीक केलेली पावडर , दोन चमचे मिल्क पावडर आणि वेलचीपूड टाकून नीट हलवून घ्यायचं आणि मिश्रण एकजीव करायचं.
>> त्यानंतर त्यात एक चमचा साजूक तूप घालून मिश्रण एकजीव करत रहायचं.मिश्रणाचा गोळा बनायला लागला की गॅस बंद करावा आणि मिश्रण झाकून थंड व्हायला ठेवून द्यावं.पाच मिनिटानंतर मिश्रण परत छान मळून घेऊन असलेल्या मिश्रणातून थोडा भाग वेगळा काढून त्यात हवा तो खाण्याचा रंग मिक्स करून घ्यायचा ,मी पिवळा रंग वापरलाय.
>> ह्या राहिलेल्या मिश्रणाची छान पोळी लाटून त्यावर रंग मिश्रीत मिश्रणाचा रोल करून ठेवून ती पोळी रोल करायची आणि हवा असेल तर वरून चांदीचा वर्ख लावायचा .अशा तर्हेने मस्त शेंगदाणा कतली रोल तयार.