आपला आहार आणि आरोग्य हे एक समीकरणचं असतं. आपण जेवणातून ज्या पदार्थांचे सेवन करतो, त्या पदार्थांचे आणि त्यातील पोषक घटकांचे आपल्या शरीरावर चांगले वाईट परिणाम होत असतात. अशातच आपला नाश्ता, दुपारचं जेवणं आणि रात्रीचं जेवण यांमध्ये समतोल राखणं, तसेच आरोग्यदायी अशा पदार्थांचा समावेश करणं हे फायद्याचं ठरतं. यापैकी रात्रीचं जेवणं आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचं ठरतं. जर तुम्हालाही रात्रीच्या वेळी आंबट पदार्थ खाण्याची सवय असेल तरवेळीच सावध व्हा. करण तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. कारण रात्रीच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करणं टाळणं आवश्यक आहे. त्यापैकीच एक म्हणजे आंबट पदार्थ...
पचनाची समस्या
घरातील वडिलधारी माणसं अनेकदा रात्रीच्या जेवणामध्ये आंबट पदार्थ खाऊ देत नाहीत. कारण या पदार्थांमध्ये अम्लीय तत्व असतात. जे पदार्थ खाल्याने तुम्हाला गॅसच्या समस्येचा सामना करावा लागतो. रात्रीच्या जेवणात आंबट पदार्थांचा समावेश केल्याने पचनाच्या समस्यांचा सामना करावा लागतो.
होऊ शकतात हे आजार
उत्तम आरोग्यासाठी शरीरातील तीन दोषांमध्ये संतुलन असणं आवश्यक असतं. आयुर्वेद विशेषज्ञांनुसार, 'रात्रीच्या वेळी आंबट पदार्थ खाल्याने वातदोषसंदर्भात समस्या निर्माण होऊ शकतात.
संध्याकाळच्या दरम्यान वायू वरच्या दिशेला असते. अशा परिस्थितीमध्ये आंबद पदार्थ वात दोषासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे रात्रीच्या आहारामध्ये आंबट पदार्थांचा समावेश करणं टाळावं. जेणेकरून शरीरामध्ये असणाऱ्या सर्व दोषांमध्ये संतुलन राखणं सोपं होइल.
वातदोषाची समस्या उद्भवल्यामुळे व्यक्तीचं पचनसंस्था व्यवस्थित काम करत नाही. जेव्हा पचनसंस्था व्यवस्थित काम करत नाही. त्यावेळी शरीराला जेवणातून मिळणारी पोषक तत्व व्यवस्थित मिळत नाहीत.
पोषक तत्वांची कमी
रात्रीमध्ये आंबट पदार्थ खाल्याने पोटामध्ये आम्लचे प्रमाण वाढते. जी शरीरासाठी आवश्यक असणारी पोषक तत्व शोषून घेण्यात अडथला निर्माण करतात. जर तुम्हालाही आंबट पदार्थ खाण्याची सवय असेल तर आजपासूनच ही सवय बदला.