Sprouted Potato: बटाट्याची भाजी किंवा बटाट्यांचे वेगवेगळे पदार्थ भारतीय घरांमध्ये जवळपास रोज खाल्ले जातात. लहान मुले असो वा घरातील मोठे सगळ्यांनाच बटाट्याची भाजी आवडते. बटाटे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवून सेवन करू शकता. त्यामुळे जास्तीत जास्त लोक घरात भरपूर बटाटे आणून ठेवतात. पण बटाटे जास्त दिवस ठेवले तर त्यांना कोंब येण्यास सुरूवात होते. लोक हे कोंब काढून बटाट्यांचा वापर करतात. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, बटाट्यांच्या कोंबांचा आरोग्यावर काय परिणाम होतो. हे कोंब आरोग्यासाठी नुकसानकारक असतात. का? ते जाणून घेऊ.
कोंब आलेल्या बटाट्यांचा प्रभाव
जेव्हा बटाटे घरात अनेक दिवस ठेवले जातात तेव्हा त्यांना कोंब येतात. जर कोंब येऊ द्यायचे नसतील तर बटाटे मोकळ्या जागेत पसरवून, हवेशीर जागेत ठेवण्याचा सल्ला दिला जातो. एक्सपर्ट सांगतात की, कोंब आलेले बटाटे खाल्ल्याने डोळे मोठे होण्याचा धोका असतो.
जेव्हा बटाट्यांना कोंब येतात तेव्हा त्यात ग्लायकोअल्कलॉइड्स नावाचा नॅचरल विषारी पदार्थ तयार होतो. नॅशनल कॅपिटल पॉयझन सेंटरच्या रिपोर्टनुसार, अशा बटाट्यामध्ये सोलनिन आणि चकोनिन नावाचे दोन ग्लाइकोअल्कलॉइड्स म्हणजे विषारी तत्व आढळतात. तसे हे दोन्ही तत्व सगळ्याच बटाट्यांमध्ये असतात. मात्र, हिरव्या आणि कोंब आलेल्या बटाट्यांमध्ये यांचं प्रमाण जास्त असतं.
कोंब आलेले बटाटे खाण्याचे नुकसान
कोंब आलेल्या बटाटे खाल्ल्याने तुम्हाला उलटी, जुलाब आणि पोटदुखीची समस्या होऊ शकते. त्याशिवाय असे बटाटे खाल्ल्याने डोकेदुखीची समस्या देखील वाढते. तसेच शुगरच्या रूग्णांसाठी असे बटाटे खाणं नुकसानकारक ठरू शकतं.
फूड पॉयझनिंगचा धोका
जर तुम्ही नेहमीच कोंब आलेल्या बटाट्यांचं सेवन करत असाल तर याचे गंभीर नुकसान होऊ शकतात. कोंब आलेल्या बटाट्यामधील कार्बोहाइड्रेट स्टार्च शुगरमध्ये रूपांतरित होतं. ज्यामुळे तुमच्या शरीरात ब्लड शुगरची लेव्हल वाढते. कोंब आलेल्या बटाट्याने आपलं पचन तंत्रही कमजोर होतं. इतकंच नाही तर याने फूड पॉयझनिंगचाही धोका होतो.
कोंब न येण्यासाठी काय करावे?
- बटाट्याचा रंग हिरवा दिसत असेल आणि त्यावर कोंब येत असतील तर तो बटाटा वापरू नका.
- बटाटे अशा ठिकाणी ठेवा जिथे सूर्याची किरणे पोहोचतील आणि फार थंडेत जागेवर बटाचे ठेवू नका.
- बटाटे घरात कांद्यासोबत ठेवू नका. कारण याने गॅस रिलीज होतो आणि बटाट्यांना कोंब येणं सुरू होतं.
- जर तुम्ही जास्त बटाटे आणले असतील तर ते कॉटनच्या पिशवीत ठेवू शकता. ज्यामुळे त्यांना हवाही लागेल.
- बटाट्या कोंब आलेला भाग बागेत मातीत लावला तर याने बटाट्याचं झाडही उगवू शकता.