(Image Credit : Washington Post)
फास्ट फूड हे चवीला चांगलं लागत असल्याने अनेकजण त्यावर तुटून पडतात. पण फास्ट फूड खाण्याचे अनेक दुष्परिणामही वेळोवेळी सांगितले गेले आहेत. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये सुद्धा हेच सांगण्यात आलं आहे. यात सांगण्यात आलं आहे की, गेल्या ३० वर्षात फास्ट फूड आरोग्यासाठी अधिक जास्त घातक झाला आहे. हा रिसर्च अमेरिकन बोस्टन यूनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांनी केला. यात १९८६ पासून ते २०१६ दरम्यान अमेरिकेच्या प्रसिद्ध फूड चेनमध्ये मिळणाऱ्या फास्ट फूडची तुलना केली गेली. यातून समोर आलेले निष्कर्ष धक्कादायक आहेत.
बर्गरमध्ये मीठ वाढलं
बर्गर, बरीटो आणि याचप्रकारच्या फास्ट फूडमध्ये मिठाचं प्रमाण फार जास्त वाढलं आहे. हे १९८६ मध्ये दिवसभराच्या गरजेच्या केवळ २७.८ टक्के असायचं. २०१६ मध्ये हे ४.६ टक्के दराने वाढून ४१.६ टक्के इतकं झालं आहे. याची साइज आणि कॅलरी काउंट सुद्धा २४ टक्क्यांनी वाढलं, म्हणजे दर १० वर्षांनी १३ ग्रॅम.
गोडवा सुद्धा वाढला
फास्ट फूड म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या गोड पदार्थांच्या वजनातही वाढ झाली आहे. दर १० वर्षांनी याचं वजन २४ ग्रॅमच्या दराने वाढलं आहे. कॅलरी काउंटही दर १० वर्षात ६२Kcal वाढला आहे.
चिप्सची साइजही वाढली
फ्रेन्च फ्राइज आणि चिप्ससारखे साइड डिश म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या फास्ट फूडमध्ये मीठ १०० टक्के वाढलं आहे. हे दिवसभराच्या गरजेच्या ११.६ टक्के वाढून २३.२ टक्के झालं आहे. याचा कॅलरी काउंट २४ टक्क्यांनी वाढला आहे.
तसा तर हा रिसर्च अमेरिकेत करण्यात आला. अमेरिकेत आज ४० टक्के लोक जाडेपणाने ग्रस्त आहेत. तर १९६० च्या दशकात केवळ १३ टक्के लोकसंख्या जाडेपणाने ग्रस्त होती. भारतात फास्ट फूडचा आकार आणि वजन अमेरिका व यूरोपच्या देशां इतका नाही. तरी सुद्धा इथे २००५-०६ ते २०१५-१६ दरम्यान जाड लोकांची संख्या दुप्पट झाली आहे.