(Image Credit : YouTube)
उन्हाळा आला की, शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी आणि या उकाड्यात थोडा दिलासा मिळवण्यासाठी लोक वेगवेगळ्या ज्यूसचं सेवन करतात. पण हे करत असताना ही गोष्ट ध्यानात घ्यायला हवी की, तुम्ही जे काही सेवन करता ते हेल्दी असायला हवं. उन्हाळ्यात सामान्यपणे थंड राहण्यासाठी कैरीचं पन्हं, नारळाचं पाणी, बेल आणि उसाचा रस सेवन केला जातो. पण वेगळं काही ट्राय करायचं असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत. आम्ही तुम्हाला पुदीना छास घरीच कसा तयार करायचा हे सांगणार आहोत.
पुदीना छाछ शरीरासाठी फायदेशीर असतं. हे तुम्ही सकाळी किंवा दुपारी जेवणासोबतही घेऊ शकता. अनेकजण उन्हाळ्यात भूक न लागण्याची तक्रार करत असतात. पुदीना छाछ सेवन केल्याने हू भूक न लागण्याची समस्या, पोटात जडपणा वाटणे, अपचन, पोटात जळजळ होणे अशा समस्या दूर होतात. हा स्पेशस ज्यूस तयार करण फारच सोपं आहे.
१) पुदीन्याची ८ ते १० पाने घ्या
२) १ छोटा चमचा जिऱ्याची पुड
३) काळं मीठ अर्धा चमचा
४) काळे मिरे पावडर अर्धा चमचा
५) ताक २ कप
६) दही २ कप
७) काही बर्फाचे तुकडे
८) मीठ टेस्टनुसार
कसा कराल तयार?
पुदीन्याची पाने चांगली धुवून घ्या. मिक्सरमध्ये पुदीन्याची पाने, ताक, दही, जिऱ्याची पुड, काळे मिरे, काळं मीठ आणि मीठ टाका. हे चांगल्या प्रकारे बारीक करा. हे मिश्रण एका भांड्यात काढा. त्यात एक ग्लास पाणी टाकून चांगलं ढवळा. यात बारीक केलेला बर्फ टाका. तुमचं स्वादिष्ट पुदीना छास तयार आहे.