मका आणि मक्याचे दाणे सध्या वर्षभर बाजारत पहायला मिळतात. कॉलेज किंवा ऑफिसला जाणारे लोकही सकाळच्या धावपळीमध्ये नाश्त्यासाठी कॉर्नचीच निवड करतात. एवढचं नाही तर अनेक ठिकाणी स्पायसी स्वीट कॉर्नचे पार्लरही पाहायला मिळतात. पण तुम्हाला माहीत आहे का? हे टेस्टी स्वीट कॉर्न आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. पोषकतत्वांनी परिपूर्ण असलेल्या मक्याचे अनेक फायदे आहेत ते जाणून घेऊया...
आरोग्यासाठी फायदेशीर आहेत स्वीट कॉर्न
स्वीट कॉर्न म्हणजेच मक्यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन्स, फायबर आणि अॅन्टीऑक्सिडंट यांसारखी पोषक तत्व असतात. स्वीट कॉर्न शिजवल्यानंतर त्यामध्ये 50% अॅन्टीऑक्सिडंट वाढतात. याव्यतिरिक्त शिजलेल्या मक्यामध्ये मुबलक प्रमाणात फेरुलिक अॅसिड असतं. जे कॅन्सरसारख्या घातक आजारांपासून लढण्यासाठी मदत करतात.
व्हिटॅमिन ए
स्वीट कॉर्नमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि कॅरोटेनॉयड्स अस्तित्वात असतात. जे डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. मक्याच्या सेवनाने डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी मदत होते.
विटामिन बी 12
स्वीट कॉर्नमध्ये व्हिटॅमिन बी12 आयर्न आणि फोलिक अॅसिड मुबलक प्रमाणात असतं. जे शरीरातून रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी मदत करतात.
आयर्न
शरीरात आयर्नही मुबलक प्रमाणात आढळून येतं. जे नवीन ब्लड सेल्स तयार करण्यासाठी मदत करतात. ज्यामुळे शरीरामध्ये रक्ताची कमतरता आढळून येत नाही.
फेनोलिक फ्लॅवोनॉइड्स
फेनोलिक फ्लॅवोनॉइड्स मुबलक प्रमाणात आढळून येतात. जे एक प्रकारचे अॅन्टीऑक्सिडंट्स आहेत. दररोज स्वीट कॉर्नचे सेवन केल्याने कॅन्सरसारख्या घातक आजारांपासून बचाव होतो.
मक्याचे धागे
आपल्यापैकी अनेकजण मका आवडीने खातात. पण मका खाताना त्यातील चमकदार बारीक धाग्यांकडे मात्र सगळेच दुर्लक्ष करतात. मक्याच्या सालीसह हे धागेही कचरा म्हणून फेकले जातात. या मुलायम आणि चमकदार धाग्यांना कॉर्न सिल्क म्हटलं जातं. कॉर्न सिल्कमध्ये स्टग्मास्टरोल आणि सिटेस्टेरोल तत्त्व असतात. हे हृदयरोग आणि कोलेस्ट्रॉलपासून बचाव करण्यासाठी फारच प्रभावीपणे काम करतात. तसेच याने शरीरात ग्लूकोजचं प्रमाणही नियंत्रित राहतं.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.