Vegetable Oats Soup : जे लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात ते लोक एक्सरसाईज करण्यासोबतच हेल्दी डाएट घेण्यावरही भर देतात. अशात लोक वेगवेगळ्या हेल्दी गोष्टींचं सेवन करतात. एक्सरसाईजसोबतच हेल्दी डाएटशिवाय तुम्ही वजन कमीच करू शकत नाही. अनेकदा लोक हेल्दी फूडच्या नावाखाली टेस्ट नसलेले पदार्थ खातात आणि कंटाळून जातात. कंटाळा आला की, लोक वजन कमी करण्याचा नादही सोडतात.
सूप हे एक खूप हेल्दी फूड आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या सूपचं सेवन करून तुम्ही वजनही कमी करू शकता आणि आरोग्यही चांगलं ठेवू शकता. सूपचे फायदे असे आहेत की, एकतर ते लवकर तयार होतं आणि यात तुम्ही वेगवेगळ्या हेल्दी गोष्टी टाकू शकता. याने शरीराला भरपूर पोषक तत्वही मिळतात आणि तुम्हाला वेगळी टेस्टही मिळते. व्हेजिटेबल ओट्स सूप असंच एक हेल्दी सूप आहे. याचीच रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
व्हेजिटेबल ओट्स सूप रेसिपी साहित्य
ऑलिव ऑईल- 1 टेबलस्पून
लसूण - 1 टीस्पून
आले - 1 टीस्पून,
सेलेरी - 1 टीस्पून,
कोथिंबिर - 1 टीस्पून
कांदा - 1/4 कप
ओट्स- 1/4 कप,
काही भाज्या - मशरूम, बीन्स, पत्ता कोबी, गाजर एक कप
व्हेजिटेबल स्टॉक- 2 कप
मीठ - टेस्टनुसार
काळी मिरी - 1/2 टीस्पून
कसं बनवाल?
एक पॅन गॅसवर गरम करा. पॅन गरम झाल्यावर त्यात तेल टाका. तेलात लसूण, आले, कांदा आणि कोथिंबिर टाकून हलकं भाजा. नंतर यात ओट्स टाकून काही वेळ भाजा. त्यानंतर यात कापलेल्या भाज्या टाका. नंतर यात व्हेजिटेबल स्टॉक, मीठ, काळी मिरी आणि राहिलेला कोथिंबिर, थोडं पाणी टाकून 15 ते 20 मिनिटे होऊ द्या. तयार आहे तुमचं खास सूप. या सूपने वजन कमी होण्यास मदत तर मिळतेच सोबतच याने सर्दी-खोकला अशा समस्याही दूर होतात.