शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
2
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
3
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
4
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
5
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
6
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
7
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
8
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
9
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
10
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
11
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
12
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
13
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
14
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
15
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
16
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
17
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
18
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
19
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
20
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?

कबाब आणि वडापावची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2023 11:34 AM

आर्थिक चणचण असते तेव्हा उपलब्ध मोजक्या साधनसामुग्रीमध्ये चवदार पदार्थ, झटपट करण्याचा प्रयत्न असतो.

- शुभा प्रभू साटम (खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक)

समाजातल्या बदलांचं एक महत्त्वाचं कारण स्थलांतर. बदलत्या काळामागे धावता-धावता पोटापाण्यासाठी लोक आपलं गाव, आपला देश सोडून दूरदेशी गेली. त्यांचा देश दूर राहिला; पण तिथल्या अनेक गोष्टी मुख्यत्वे पदार्थ, घरचं जेवण ते विसरू शकले नाहीत. कधी आर्थिक स्थिती जेमतेम, कधी हाती पैसे असले तरी रांधण्यासाठी हवे ते जिन्नस मिळणं अवघड; मग त्यातूनही त्यांनी मार्ग काढले. त्यातून हळूहळू उदयाला आलं ते स्ट्रीट फूड. टपरी खाणं.आर्थिक चणचण असते तेव्हा उपलब्ध मोजक्या साधनसामुग्रीमध्ये चवदार पदार्थ, झटपट करण्याचा प्रयत्न असतो.

याचं उत्तम उदाहरण म्हणजे क्युबन आणि मेक्सिकन जेवण. क्युबा आणि मेक्सिकोतून अमेरिकेत जगायला गेले ते मजूर!  त्यांनी त्यांचं जेवण तिथं नेलं, आणि आज अमेरिकेत रस्त्यारस्त्यावर मेक्सिकन जेवणाचे फूड ट्रक दिसतात. तेच मध्य पूर्वेतील देशांचं! या लोकांनी ते जिथे गेले तिथे कबाबसारखे पदार्थ लोकप्रिय केले. दक्षिण भारतातील पदार्थ भारतात सर्वदूर का लोकप्रिय झाले? तिथून आलेल्या लोकांमुळे, त्यांनी दाखवलेल्या चविष्ट पोटभरीच्या पदार्थांमुळे!

आज मुंबईतील लोकप्रिय स्ट्रीट फूड कोणतं असं विचारलं  तर पहिले छूठ उत्तर येईल, वडापाव ! आता हा वडापाव निव्वळ आर्थिक मजबुरीतून उदयाला आलेला प्रकार. तेच उसळ, मिसळ पाव, भुर्जी पाव, अगदी समोसा पाव पण. कमी पैशात भरपूर चवदार जेवण हे स्ट्रीट फूडचं वैशिष्ट्य आणि तेच त्याच्या लोकप्रियतेचं गमक. अती उच्चभ्रू शाही हॉटेल्सपण त्यांच्याकडे त्यांच्या नाजूक साजूक खवय्यांसाठी स्ट्रीट फूड फेस्टिव्हल्स आयोजित करतात. या स्ट्रीट फूडची मोहिनीच जबरदस्त असते.

एक कारण हे की, आपल्या आयुष्याच्या संघर्षाच्या काळात अशाच स्वस्त जेवणानं आपल्याला तगवलेलं असतं, आईच्या हातच्या जेवणासाठी जसा एक हळवा कोपरा असतो, तसाच या खाण्यासाठीही असतो. आधी पर्याय नसल्याने आणि नंतर चटक लागल्यामुळे जगभरात स्ट्रीट फूड कमाल लोकप्रिय होतं- आहे आणि राहणार. या सदरात आपण अशाच स्ट्रीट फूडविषयी बोलू, ते आलं कुठून आणि रुळलं कसं याच्या कहाण्या तितक्याच चवदार आहेत!

shubhaprabhusatam@gmail.com

टॅग्स :foodअन्न