अनेकदा बाहेरचे अरबट चरबट पदार्थ खाल्याने आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आणि त्यात जर पोट बिघडलं तर मग अगदी हैराण व्हायला होतं. अशातच अनेकजण आपल्या डाएटकडे विशेष लक्ष देतात. तरिही अनेकदा मळमळ होणं, अलट्या होणं, बद्धकोष्ट किंवा पोट बिघडण्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो.
जाणून घेऊया पोटाच्या समस्या उद्भवल्यावर डाएटमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करणं फायदेशीर ठरतं त्याबाबत...
केळी
केळी पचण्यास अगदी हलकी असतात. उलट्या होणं किंवा पोट खराब होणं यांमुले शरीरामध्ये पोटॅशिअमची कमतरता भासते. अशातच केळी खाल्याने पोटॅशिअमची कमतरता भरून निघते. तसेच केळ्यामध्ये पेक्टिन नावाचं विशेष फायबर असतं. जे पोटामध्ये खाण्या-पिण्यामुळे होणारी गडबड दूर करतो. तसेच केळी खाणं पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
दही
दह्यामध्ये आढणारे प्रोबायोटिक बॅक्टेरिया पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे दही खाणं पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. जर दही फार घट्ट असेल तर त्यामध्ये ताक एकत्र करू शकता. हे एक्सट्रा प्रोबायोटिक्ससोबतच शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतं.
खिचडी
भारतीय पदार्थांमध्ये समाविष्ट होणारी खिचडी आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. मसाल्यांचा वापर केल्याशिवाय मूगाची डाळ आणि तांदूळ यांचा वापर करून केली जाणारी खिचडी पोट बिघडल्यावर अत्यंत फायदेशीर ठरतं. पचनाच्या समस्यांवर उपाय म्हणून तयार करण्यात येणारी खिचडी सर्वात हलक्या पदार्थांपैकी एक आहे.
नारळाचं पाणी
नारळाच्या पाण्यामध्ये इवेक्ट्रोलाइट्स असतात. जे शरीर हायड्रेट करण्यासाठी मदत करतात. तसं पाहायला गेलं तर हे इलेक्ट्रोलाइट्स नॅचरली शरीरामध्ये आढळून येतात. परंतु जेव्हा तुम्ही आजारी असता. त्यावेळी हे इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात. नारळाचं पाणी इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता नैसर्गिक पद्धतीने पुर्ण करण्यासाठी मदत करतात.
पपई
पोटाच्या समस्यांमध्ये पपई अत्यंत फायदेशीर ठरते. पपईमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन्स आढळून येतात. याव्यतिरिक्त पपईमध्ये पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणारं एंजाइम पपाइन असतं.
पोट खराब झालं असल्यास या पदार्थांपासून दूर राहणं ठरतं फायदेशीर...
1. चिकट आणि तेलकट पदार्थांपासून दूर राहा2. मसालेदार अन्नपदार्थ3. कच्च्या भाज्या 4. दूध5. चहा किंवा कॉफी
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणाताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)