उत्सवात कितीही नाही म्हटलं तरी जास्त जेवण होणे किंवा प्रमाणापेक्षा जास्त खाने या गोष्टी होतातच. खासकरुन दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये तुम्हीही किती टाळण्याचा प्रयत्न केला तरी वेगवेगळे गोड पदार्थ तुम्हाला आकर्षत करतातच. अशावेळी मन मारण्याऐवजी दिवाळीचा मनमुराद आनंद घ्या आणि त्यानंतर असा काही उपाय शोधा ज्याने तुमची बॉडी डीटॉक्स होईल. तुमच्या मदतीसाठी आम्ही तुम्हाला असे काही फूड्स सांगत आहोत जे खाऊन तुम्ही बॉडी डीटॉक्स करु शकता.
लिंबू
लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतात. याने तुम्हाला सर्दी-खोकल्यापासून आराम मिळेल. सोबतच पचनक्रियेसाठीही लिंबू फायदेशीर ठरतं, लिंबाच्या आंबट चवीने बाइल ज्यूसचा फ्लो वाढतो आणि याने पचनक्रिया सुरु होते. लिंबाच्या सालीमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट असतात ज्याने डीटॉक्सिफिकेशन होतं.
कोथिंबिर
कोथिंबिरीचे दाण्यामुळेही पचनक्रिया सुधारते आणि कोलेस्ट्रॉल लेव्हलही नियंत्रणात राहते. तर याच्या पानांमुळे शरीरात जमा असलेलं हेवी मेटलही डीटॉक्स होतं. कोथिंबिर तुम्ही सलाद, डाळ आणि भाजीमध्ये टाकून खाऊ शकता. तसेच याची चटणीही करु शकता.
टोमॅटो
टोमॅटोमुळेही शरीराचं स्टिस्टम चांगलं होऊन डीटॉक्स होतं. उत्सावाच्या दिवसात जास्त हेवी जेवण झालं असेल तर तुम्ही टोमॅटो सूप किंवा सलाद खाऊ शकता. याने तुम्हाला हलकं वाटेल.
दही
या दिवसात एक वाटी दही खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं. दह्यामध्ये प्रोबायॉटिक्स असतं, याने शरीराला पचनक्रिया सुधारणारे लाभदायक बॅक्टेरिया मिळतात. याने खाल्लेलंही लवकर पचण्यास मदत होते.
ग्रीन टी
ग्रीन टी चे अनेक फायदे तुम्हालाही माहीत असतीलच. हा चहा सुद्धा एक चांगला डीटॉक्सिफाइंग एजंट आहे. याने तुमच्या शरीरातील हानिकारक तत्त्वे बाहेर निघतात. यात डीटॉक्स एजंट असणारं कॅटेचिन आढळतं जे लिवरच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतं.