पुणे : पोहे आवडत नाही अशी व्यक्ती सापडणे विरळच. पण या पोह्यातही तर्री पोहे, कांदा पोहे, दडपे पोहे असे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक भागात वेगवेगळ्या चवीचे पोहे बनतात. कोकणात मुबलक नारळ असल्यामुळे तिथे बनणारे दडपे पोहे भन्नाट चवीचे असते. तेलकट नसणारे आणि सर्वांना आवडतील असे दडपे पोहे नक्की करून बघा.
साहित्य :
- दोन वाट्या पातळ पोहे
- दोन कांदे बारीक चिरुन
- पाच ते सहा मिरच्या बारीक चिरुन
- एक मोठा नारळ खवुन
- नारळ पाणी एक मोठा ग्लास भरुन
- कढीपत्ता एक डहाळी
- एका लिंबाचा रस
- साखर
- मीठ आणि कोथिंबीर,
- फोडणीसाठी तेल
कृती : पहिल्यांदा पोहे नारळाच्या पाण्यात भिजवून ठेवावेत.
- दहा मिनिटांनी त्यात कांदा, खोवलेला नारळ मीठ साखर, लिंबाचा रस मिसळा.
- सगळे एकत्र नीट कालवा.
- आता छोट्या कढईत तेल गरम करत ठेवा त्यात तापल्यावर मोहरी, हिरव्या मिरच्या ज्या आपण कापून ठेवल्यात त्या घाला, कढीपत्ता घालावा आणि हिंग घालून गॅस बंद करावा.
- ही फोडणी आता पोह्यावर ओतून नीट मिसळून घ्या.
- आता दहा मिनिटे दडपून ठेवायचे म्हणजे झाकून ठेवावे .
- मग कोथींबीर घालावी आणि खायला द्यावे दडपे पोहे