हळदीच्या दूधाचे फायदे आपल्या सर्वांना माहीत आहेच. आयुर्वेदातही याबाबत उल्लेख करण्यात आला आहे. हळदीच्या दूधाचे अनेक फायदे आहेत. याच्या चर्चा नेहमी पाहायला मिळतात. असं म्हटलं जातं की, यामुळे सर्दी, खोकला आणि जखम लगेच भरून निघते. एवढचं नाहीतर शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं. आपल्या अनेक गुणांसोबतच हळदीचं दूध वजन कमी करण्यासाठीही मदत करतं. हळदीला अल्टेरनेटिव्ह मेडिसिन म्हणून वापर केला जातो. त्यामुळे आरोग्यासाठी हळदीचं दूध अत्यंत फायदेशीर ठरतं.
झोपण्यापूर्वी बेस्ट ड्रिंक
जर तुम्ही दररोज हळदीचं दूध पित असाल तर अगदी सहज वजन कमी करू शकता. जर तुम्हाला रात्री जेवल्यानंतर आणि झोपण्याआधी भूक लागत असेल तर हळदीचं दूध पिणं फायदेशीर ठरतं.
का ठरतं फायदेशीर?
हळदीमध्ये थर्मोजेनिक प्रॉपर्टीज असतात. ज्या तुमच्या शरीराचं मेटाबॉलिज्म वाढविण्यासाठी मदत करतात. यामुळे तुमच्या कॅलरी बर्न होतात.
प्रोटीनचा परफेक्ट सोर्स
जर एकदा वजन कमी केल्यानंतर ते परत वाढू नये असं वाटत असेल तर प्रोटीन उत्तम सोर्स आहे. दूधामध्ये प्रोटीन आणि कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असतं आणि त्याचबरोबर हळदीणध्येही अनेक पोषक तत्व असतात.
फॅट्स बर्न करतात
हळदीमध्ये डाएटरी फायबर्स असतात जे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात आणि फॅट्स कमी करतात.
तयार करण्याची योग्य पद्धत :
जास्तीत जास्त लोक कुटलेली हळद दूधामध्ये एकत्र करून त्याचं सेवन करतात. दरम्यान, हळदीच्या पावडर ऐवजी हळकुंड जास्त इफेक्टिव्ह असतं. तुम्ही एखादं हळकुंड घेऊन ते वाटून घ्या. त्याचबरोबर काळी मिरीची पावडर करून एकत्र करा. आता एक कप दूध एकत्र करून त्यामध्ये कुटलेली हळद आणि मिरी पावडर एकत्र करा. 20 मिनिटांपर्यंत उकळल्यानंतर गाळून घ्या त्यामध्ये एक चमचा मध एकत्र करून प्या.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)