(Image Credit : Dr. Weil)
घराघरातील किचनमध्ये सहज मिळणारी आणि वेगवेगळे पदार्थ तयार करताना वापरली जाणारी हळद आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सर्वांना माहित आहे. फार पूर्वीपासूनच हळद डायबिटीज, लिवरची समस्या, पिंपल्स आणि त्वचेसाठी फायदेशीर मानली जाते. अॅंटी-ऑक्सिडेंट आणि अॅंटी-इंफ्लेमेटरी गुण असलेली हळद फ्री रॅडिकल्ससोबत लढण्यास मदत करते. तसेच शरीरात होणाऱ्या वेदना आणि सूज कमी करण्यासही मदत करते.
पोषक तत्त्व - हळदीमध्ये असलेले कॅल्शिअम, मिनरल्स आणि इतरही पोषत तत्वे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. जर तुम्हाला हेल्दी रहायचं असेल तर तुम्ही रोज हळदीचा चहा घेऊ शकता. कारण हळदीच्या चहामध्ये अनेक फायदेशीर गुण असतात, ज्याने तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात.
हळदीमध्ये अॅंटीसेप्टिक आणि अॅंटीबायोटिक्ससोबतच वोलेटाइल ऑईल, पोटॅशिअम, ओमेगो -३ फॅची अॅसिड, लायनोलेनिक अॅसिड, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट तसेच फायबर असतात.
कसा कराल तयार
हळदीचा चहा तयार करण्यासाठी ताजी हळद, हळद पावडर किंवा हळकुंडाचाही वापर करु शकता. चहा तयार करण्यासाठी दीड किंवा दोन कप पाणी, अर्धा चमचा बारीक केलेलं आलं, एक चमचा हळद पावडर, अर्धा लिंबू आणि एक चमचा मध हवं.
सर्वातआधी २ कप पाणी उकळून घ्यावे. त्यात अर्धा चमचा आल्याचे तुकडे टाका. तसेच त्यात एक चमचा हळद पावडर टाका. आता गॅस बंद करा आणि चहा झाकून ठेवा. ५ ते ७ मिनिटांची हा चहा गाळून कपात काढा. आता त्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचा मध टाकून हा चहा तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला हवं असेल तर लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही संत्र्याचा रसही वापरु शकता.
चहाचे फायदे
हळदीच्या या खास चहाने तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ब्लड शुगरला रेग्युलेट करण्यासोबत हळदीचा चहा पचनक्रियेसाठीही फायदेशीर आहे. आणि जेव्हा पचनक्रिया चांगली होते तेव्हा वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगाने काम करु लागते. हळदीमध्ये अॅंटी इनफ्लेमेटरी तत्व असतं आणि हे तत्व फॅट सेलची वाढ होऊ देत नाही.