शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
2
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
3
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
4
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
5
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
6
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
7
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
8
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
9
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
11
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
12
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
13
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
14
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
16
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
17
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
18
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
19
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
20
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...

घरच्याघरी च्यवनप्राश करायचाय? मग या दोन पध्दतीपैकी एक पध्दत निवडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 6:12 PM

बाजारात विविध ब्रॅण्ड्सचे च्यवनप्राश चकाचक पॅकिंगमध्ये मिळतात. ते न आणता घरीच सहजसोप्या पद्धतीनं च्यवनप्राश बनवून पाहा. च्यवनप्राशमध्ये विविधप्रकारच्या औषधी घटकांचा समावेश असतो. आपण मात्र जी उपलब्ध होतील ते वापरून च्यवनप्राश घरीच तयार करु शकतो. च्यवनप्राश तयार करण्याच्या दोन सोप्या पध्दती आहेत.

ठळक मुद्दे* हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मिळणा-या आवळ्यापासून मुरंबा तयार करण्याची परंपरा भारतात आढळते. तसे आवळ्यापासून विविध पदार्थ बनतात. परंतु, आरोग्य संवर्धनासाठी परिपूर्ण पदार्थ म्हणजे च्यवनप्राश.* धकाधकीच्या जीवनात नाश्ता, जेवण यासाठी पुरेसा वेळ देता येत नसल्यामुळे विविध आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. त्याचा सामना करत असाल तर पहिल्यांदा च्यवनप्राश खाणं सुरु करा.

- सारिका पूरकर गुजराथीथंडी सुरु होताच घराघरात पौष्टिक पदार्थांचा रतीब सुरु होतो. खारीक-खोब-याच्या लाडवांबरोबरच बाजारात मिळणा-या गाजर, हरभरे, मटार, मुळा, बीट, आवळे यांचे अनेक नवनवीन प्रयोग सुरु असतात.

यात आवळ्यावरचे प्रयोग अतिशय महत्त्वाचे. कारण आवळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. संपूर्ण आरोग्याच्या दृष्टीनं आवळा वरदान आहे. लोह, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, कॅल्शिअम, बी कॉम्प्लेक्स हे सर्व आवळ्यात ठासून भरलेलं आहे. म्हणूनच डोळे, केस, पोट , हाडे यांच्या निरोगी आरोग्यासाठी आवळा नेहमी खायला हवा. म्हणूनच हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मिळणा-या आवळ्यापासून मुरंबा तयार करण्याची परंपरा भारतात आढळते. तसे आवळ्यापासून विविध पदार्थ बनतात. परंतु, आरोग्य संवर्धनासाठी परिपूर्ण पदार्थ म्हणजे च्यवनप्राश.

 

 

शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवणं, ताण-तणाव कमी करणं, शरीरास ताकद आणि स्फूर्ती प्रदान करणं, हृदयाचं कार्य सुरळीत करणं,रक्त शुुद्ध करणं, पचनक्रिया सुधरवणं, त्वचा आणि केसांचा पोत छान करणं, मेंदूचं कार्य जोमानं सुरु ठेवणं, स्मरणशक्ती वाढवणं ही सर्व कामं च्यवनप्राश करतं. म्हणूनच थंडीच्या दिवसात रोज सकाळी च्यवनप्राश घ्यायलाच हवं.धकाधकीच्या जीवनात नाश्ता, जेवण यासाठी पुरेसा वेळ देता येत नसल्यामुळे विविध आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. त्याचा सामना करत असाल तर पहिल्यांदा च्यवनप्राश खाणं सुरु करा. आणि हो, बाजारात विविध ब्रॅण्ड्सचे च्यवनप्राश चकाचक पॅकिंगमध्ये मिळतात. ते न आणता घरीच सहजसोप्या पद्धतीनं च्यवनप्राश बनवून पाहा. च्यवनप्राशमध्ये विविधप्रकारच्या औषधी घटकांचा समावेश असतो. आपण मात्र जी उपलब्ध होतील ते वापरून च्यवनप्राश घरीच तयार करु शकतो.

च्यवनप्राश तयार करण्याच्या दोन सोप्या पध्दती आहेत.

 

 

च्यवनप्राश पध्दत 1साहित्य :- 1 किलो आवळे, 200 ग्रॅम ताजं आलं, 700 ग्रॅम गुळ ( शक्यतो सेंद्रिय घ्या ), 2 मोठी वेलची, 8 वेलदोडे, दालचिनीचा तुकडा, 8 लेंडी पिंपळींचे तुकडे ( काष्ट औषधी दुकानात मिळते ), 2 ग्रॅम प्रवाळभस्म, 50 ग्रॅम गुळवेल सत्वं, 50 ग्रॅम अश्वगंधा सत्वं , 50 ग्रॅम शतावरी , 1 टेबलस्पून काळीमिरी, 1/2 चमचा नागकेशर, 20 लवंगा, 1 ग्रॅम केशर, 1 चमचा वंशलोचन, पाव चमचा जायफळ पावडर आणि 200 ग्रॅम मध.कृती :- आवळे धुवून वाफवून घ्या. उकडल्यानंतर सोलून त्यातील बिया काढून फोडी करून घ्या. मिक्सरच्या भांड्यात या फोडी वाटून घ्या. आले देखील बारीक किसणीनं किसून घ्या. वर दिलेले सर्व मसाले मिक्सरमधून काढून त्याची पूड करु न घ्या. जाड बुडाच्या भांड्यात आवळ्याचा गर, किसलेलं आलं, गुळ घालून मिश्रण चांगलं आटवून घ्या. मिश्रणानं भांड्याच्या कडा सोडल्या की यात मध घाला. मिश्रण परत चांगलं ढवळा. नंतर मसाल्याची पूड घाला. च्यवनप्राश तयार आहे . थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरु न ठेवा. यात साजूक तूप घालून यातली पौष्टिकता आणखी वाढवू शकता.

च्यवनप्राश पध्दत 2

साहित्य :-1 इंच दालचिनी, 1/2 चमचा बडीशेप, 1 चमचा काळिमरी, 5-6 केशराच्या काड्या, 6-8 वेलची, सूंठ पावडर, 3-4 कप आवळे, 2 कप गूळ, साजूक तूप आणि 1 कप मध. 

कृती :- आवळे वाफवून त्याचा लगदा बनवून घ्या. जाड बुडाच्या भांड्यात साजूक तूप घालून त्यात आवळ्याचा लगदा परतवून घ्या. चांगला परतल्यावर त्यात गुळ घालून मिश्रण पुन्हा एकजीव करु न घ्या. यात आता मध घालून पुन्हा मिक्स करु न घ्या, मिश्रणानं भांड्याच्या कडा सोडल्या की यात सर्व मसाल्यांची पूड घाला. मिक्स करा. गॅस बंद करु न मिश्रण गार होऊ द्या. च्यवनप्राश काचेच्या बरणीत भरु न ठेवा.