तुम्हाला माहीत आहे का, शाकाहारी आहार म्हणजे नक्की काय? आपल्यापैकी अनेकजण उत्तर देतात की, काही असे पदार्थ ज्यांमध्ये मांस, मासे यांचा समावेश होत नाही. परंतु याव्यतिरिक्तही काही शाकाहारी डाएट आहेत त्यांमध्ये मांस आणि मासे तर सोडाचं, पण डेअरी प्रोडक्ट किंवा प्राण्यांपासून मिळणाऱ्या पदार्थांचाही समावेश करण्यात येत नाही. त्याला वेगन डाएट असं म्हटलं जातं.
फळं, भाज्या, धान्य, कडधान्य, डाळी, ड्रायफ्रुट्स या गोष्टींचा वेगन डाएटमध्ये समावेश होतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वेगन डाएटमध्ये दूध आणि दूधापासून तयार करण्यात आलेले पदार्थ खाणं टाळण्यात येतं. वेगन डाएट शाकाहारी पदार्थांपासून एक पाउल पुढे आहेच, पण या डाएटमुळे शरीराला असणाऱ्या फायद्यांबाबत करण्यात येणारे दावे हे शाकाहारी लोकांपेक्षा अधिक आहेत.
काही दिवसांपूर्वीच अमेरिकेमध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये असं समजलं की, वेगन डाएट अन्न पचवण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या हार्मोन्ससाठी फायदेशीर असतात. हा रिसर्च Nutrients नावाच्या एका जर्नलमधून प्रकाशित करण्यात आला असून त्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की, वेगन डाएटमुळे फक्त आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाणच नियंत्रणात राहत नाही तर वजन कमी करण्यासाठीही मदत होते.
अमेरिकेमध्ये करण्यात आला रिसर्च
रिसर्चमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, अन्न पचवण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या हार्मोन्समध्ये वाढ झाल्यामुळे शरीरामध्ये मुबलक प्रमाणात इन्सुलिन तयार होतं तसेच भूकही जास्त लागत नाही. या रिसर्चमध्ये संशोधकांनी वेगन डाएटची तुलना मांस आणि चीज यांच्यासोबत केली. याचा परिणाम 60 लोकांवर दिसून आला. ज्यामध्ये 20 व्यक्ती लठ्ठपणाने त्रस्त होत्या, तर 20 जणांना टाइप-2 डायबिटीजचा सामना करावा लागत होता. तसेच उर्वरित 20 व्यक्ती निरोगी होत्या.
झाडांपासून मिळारे पदार्थ डायबिटीजवर ठरतात परिणामकारक
वेगन आणि मांसाहारी डाएट दोघांमध्ये समान प्रमाणात कॅलरी आणि मायक्रोन्यूट्रिएंट असतात. परिक्षण केल्यानंतर असं दिसून आलं की, वेगन डाएट खाणाऱ्यांमध्ये जे वेगन डाएट फॉलो करत नव्हते त्यांच्यातुलनेमध्ये पचनासाठी उपयुक्त असणाऱ्या हार्मोन्समध्ये वाढ झाली होती. हे हार्मोन्स ग्लूकोज मेटाबॉलिज्म, इन्सुलिनचा स्त्राव, ऊर्जा संतुलन, पोट भरणं आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.
या संशोधनामधून असं सिद्ध झालं की, प्राण्यांपासून मिळणाऱ्या अन्नपदार्थांच्या तुलनेमध्ये झाडांपासून मिळणारे अन्नपदार्थ फक्त टाइप टू डायबिटीज होण्यापासून रोखतं, तसेच डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं आणि लठ्ठपणावरही परिणामकारक ठरतं.
याव्यतिरिक्त वेगन डाएट फॉलो करण्याचे काही फायदे :
- या डाएटमधून मोठ्या प्रमाणावर पोषक तत्व मोठ्या प्रमाणावर असतात.
- वजन कमी करण्यासाठी वेगन डाएट फायदेशीर ठरतं.
- शरीरातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतं.
- या डाएटमुळे किडनीचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते.
- शरीराला होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी वेगन डाएट उपयोगी ठरतं.
वेगन डाएटचे प्रकार :
व्होल व्हीट वेगन डाएट : यामध्ये फळं, भाज्या, डाळ, ड्रायफ्रुट्सचा समावेश करण्यात येतो.
रॉ फूड वेगन डाएट : या श्रेणीमध्ये कच्ची फळं, भाज्या, ड्रायफ्रुट्स किंवा वनस्पतींपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचा समावेश करण्यात येतो.
थ्राइव डाइट : या डाएटमध्ये व्होल व्हीट आणि रॉ फूड या दोन्ही पदार्थांचा समावेश करण्यात येतो.