(Image Credit : Veganbell)
सध्या जास्तीत जास्त लोक फिटनेसबाबत कॉन्शिअस होत आहेत. अशातच अनियमित जीवनशैली आणि त्यामुळे उद्भवणारे आजार यांमुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे सध्या अनेक लोक फिटनेस फ्रिक होत आहेत. आपल्या आहाराबाबत लोक जागरूक होत आहेत. अशातच केवळ व्यायाम करून तंदुरुस्ती मिळवता येत नाही त्यासाठी योग्य आहारही तितकाच महत्त्वाचा आहे.
फिट राहण्यासाठी आपल्या आहारात आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या पोषक तत्वांचा समावेश करणं गरजेचं असतं. यासाठी व्हेजिटेबल दलियाचा अनेक लोक आपल्या आहारामध्ये समावेश करत आहेत.
दलियामध्ये फायबर कॉन्टेंट मुबलक प्रमाणात असतं. यामुळे पोट बराच वेळ भरल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे तुम्ही ओवरइटिंगपासून दूर राहता. नाश्त्यामध्ये एक बाउल व्हेजिटेबल दलिया तुमच्यासाठी फार फायदेशीर ठरतो. यामुळे तुम्हाला शरीरासाठी आवश्यक पोषक तत्व मिळतात आणि दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी मदत करतात. यामुळे दलिया वेट लॉस डाएटसाठी उत्तम ठरतो.
डायबिटीजमध्ये फायदेशीर
डायबिटीजच्या रूग्णांसाठी व्हेडिटेबल दलिया फायदेशीर ठरतो. यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतं, जे ग्लूकोजमध्ये हळूहळू रूपांतरित होतात. यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि त्यामुळे कमीत कमी कॅलरी खर्च होतात.
याव्यतिरिक्त दलियामध्ये शरीरामध्ये आवश्यक पोषक तत्वांची पूर्तता करतात. पचनक्रियेची शक्ती वाढविण्यासाठी दलिया मदत करतो. फायबर असल्यामुळे बद्धकोष्टाची समस्या दूर होण्यास मदत होते.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही फक्त माहिती म्हणून लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणत्याही गोष्टीचा दावा करत नाही.