-सारिका पूरकर गुजराथीहिवाळा हा पौष्टिक पदार्थ खाऊन तब्येत बनवण्याचा महिना आहे.हिवाळा म्हणजे शरीर कमावण्याचा महिना आहे. खरंतर आरोग्य सुदृढ करण्याची संधी हिवाळा देत असतो.आपण मात्र काहीबाही खाऊन, जे खाणं खरंच गरजेचं आहे ते नेमकं अव्हेरून ही संधी अक्षरश: वाया घालवतो.हिवाळ्यातल्या दिवसांची संधी साधून आपणही आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. आरोग्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहेच पण त्यासोबत या व्यायामाला पूरक आहार घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. अनेकांचं वजन काही केल्या वाढत नाही. सतत बारीक दिसण्याचा त्यांनाही कंटाळा आलेला असतो. खरंतर हिवाळा म्हणजे वजन वाढवण्याचीही उत्तम संधी. फक्त त्यासाठी काही आहारीय घटकांचा, फळांचा समावेश मुद्दाम करावा लागतो. असं केल्यास आरोग्य सुदृढ होतं आणि अपेक्षित तेवढं वजनही वाढतं.1) केळी
वजन वाढवण्यासाठीचा हा सर्वोत्तम पर्याय आहे. आयुर्वेदाबरोबरच सर्वच डॉक्टरांकडून प्रमाणित असा पदार्थ. शिवाय केळी सहज उपलब्धही होतात. फक्त ती कार्बाईड इंजक्शन देऊन पिकवलेली नाहीत ना याची खात्री करून ती खरेदी करावी. केळी वजन वाढविण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. ती खाताना साजूक तूप लाऊन खावीत. एका केळीतच सुमारे 120 ग्रॅम कॅलरीज असतात. पोटॅशियम, कार्बोहायड्रेट्स हे इतर उपयुक्त घटकही असतात.
2) बटाटा
सर्वांच्या आवडीचा, लाडका बटाटा वजन वाढवण्यासाठी अगदी तुमच्या मदतीला धावून येतो असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण बटाट्यात प्रोटीन, फायबर आणि व्हिटॅमिन सी हे घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे वजन वाढवण्यासाठी आहारातलं बटाटयाचं प्रमाण वाढवायला हरकत नाही. किंवा बटाटा स्वच्छ धुवून गॅसवर वा चुलीत, निख -यावर भाजून नंतर सोलून तो नुसताच चावून खायचा. या उपायानं वजन हमखास वाढतं.
3) सुकामेवा
प्रत्येक 100 ग्रॅम सुक्यामेव्यांमध्ये 500 ते 600 कॅलरीज असतात. सुकेमेवे हे ओमेगा -3 फॅटी अॅसिडस, प्रोटीन, व्हिटॅमिन इ आणि फायबरसारख्या पोषक तत्वांनी युक्त आहेत. म्हणूनच शरीरातील कॅलरीज वाढवण्याचा सर्वात योग्य पर्याय म्हणजे सुक्यामेव्याचं सेवन. यात विशेष करु न पिस्ते अधिक लाभदायक ठरु शकतात. किंवा मग पिस्ते, बदाम, अक्र ोड, काजू यांचे मिश्र पद्धतीनं सेवनही वजन वाढवायला मदतच करतं.
4) चीज
प्रत्येक 100 ग्रॅम चीजमध्ये 400 कॅलरीज असतात. शिवाय व्हिटॅमिन्स, फॅट्स, कॅल्शिअम, प्रोटीन्स, मिनरल्स या सा-याचा एकत्रित खजिना म्हणजे चीज आहे. त्यामुळे वजन वाढवताना चीजला अग्रक्र मानं आहारात समाविष्ट करावं लागेल. चीज फक्त प्झ्झिावर पसरविण्याइतपत मर्यादित ठेवू नका. पराठा, पकोडे, थालीपीठ या नाश्त्याच्या पदार्थांमध्ये चीजचा समावेश करा. वजन वाढविण्याचा सर्वात हेल्दी पर्याय आहे हा..
5) पीनट बटर
चीजप्रमाणेच बटर देखील भरपूर कॅलरींनी युक्त आहे. त्यात पीनट बटर तर क्या कहने. ब्रेड, पोळी, मिल्कशेक्स, स्मुदीज या पदार्थांमध्ये पीनट बटरचा वापर करायला सुरूवात करा. आणि थोड्याच दिवसात वजनकाट्याचे काटे कसे झपाझप पुढे सरकता का नाही ते तपासा..पीनट बटर अर्थातच शेंगदाण्यांपासून बनत असल्यामुळे त्यात लोहही भरपूर प्रमाणात असतं.