- पवित्रा कस्तुरेउन्हाळा अजून संपलेला नाही. पावसाळा सुरु तर अजिबात झालेला नाही. कुठंकुठं वळीवाच्या दोनचार सरी बरसून गेल्या. त्यानं उष्मा वाढतोय. लाही लाही होतेय. हवामान बदलतं आहे. ऋतुूबदलाच्या या काळात आपणही आहारबदल करायला हवा तर हा बदल आपल्याला त्रासदायक ठरत नाही. अन्यथा हवामान बदलानं आजार वाढतात, शरीराचं तापमान बदलतं आणि त्यासाऱ्यातून विविध व्याधी मागे लागतात. त्यामुळे ऋतूबदलाच्या या काळात आपल्या आहारातही काही बदल करायला हवेत. ते करताना जे पचेल, आणि जे सोसेल ते खावेप्यावे हा साधा नियम. त्यामुळेच फक्त आवडतं म्हणून खात सुटण्यापेक्षा जे प्रकृतीला उत्तम ते आहारात जरुर घ्यावं.मुख्य म्हणजे एकदाच खूप जेवू नये. थोडं थोडं खावं. आणि जे जे पचायला हलकं ते ते शक्यतो याकाळात खावं. आपल्या आहारात पाण्याचं प्रमाण जास्त असावं याकडे जरुर लक्ष द्यावं. पण नुस्तं पाणी पीत राहिलं तर भूकमोड होते. त्यामुळे सतत पाणी पिता येत नाही. आणि पाणी कमी प्याल्यानं डीहायड्रेशनचा धोका असतोच. अनेकदा थकल्यासारखं होतं. गळाल्यासारखं वाटतं. पायात पेटके येतात.हे सारं टाळायचं तर रोजच्या आहारात यापैकी काही ना काही समाविष्ट केलेलं बरं..
१) काकडीकाकडी, काकडीची कोशिंबीर, सलाड हे तसं सोपं. काकडीत पाण्याचा अंश जास्त असतो त्यानं काकडी आहारात असावी.