Tomato Cucumber Combination : अनेक खाद्यपदार्थांचं कॉम्बिनेशन असं असतं जे आपल्या शरीरासाठी नुकसानकारक ठरत असतं. आयुर्वेदात याला विरूद्ध आहार म्हटलं जातं. यानुसार काही असे पदार्थ, फळं किंवा भाज्या असतात जे एकत्र कधीच खाऊ नये. काकडी आणि टोमॅटो याच यादीत येतात. या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्याने आरोग्याचं नुकसानही होऊ शकतं.
काकडी आणि टोमॅटो दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. पण या गोष्टी एकत्र खाल तर याने पोटासंबंधी वेगवेगळे आजारही होऊ शकतात. काकडी आणि टोमॅटो एकत्र खाल्ल्याने गॅस, ब्लोटिंग म्हणजेच पोट फुगणे, पोटदुखी, मळमळ, थकवा आणि अपचन यांसारख्या समस्या होतात.
आयुर्वेद काय सांगतं?
आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे की, काही खाद्यपदार्थ एकत्र खाल्ल्याने शरीराची ऊर्जा किंवा संतुलन बिघडतं. ज्यामुळे तुमचं पचन तंत्र बिघडू शकतं. यात काकडी आणि टोमॅटो यांचाही समावेश आहे.
असं का होतं?
एक्सपर्टनुसार, काकडी आणि टोमॅटो हे दोन्ही विरूद्ध आहार यादीत येतात. याचा अर्थ हा होतो की, हे काकडी आणि टोमॅटो एकमेकांच्या विरूद्ध आहेत. या दोन्हींचा पोटात पचन्याचा वेळही वेगवेगळा असतो. त्यामुळे पोटात एकत्र गेल्यावर वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात.
काकडी आणि टोमॅटोचे गुण विरूद्ध आहेत. एक लवकर पचतं तर दुसरं हळुवार. अशात दोन्ही एकत्र खाल्ल्याने समस्या तर होणारच. कारण एक आधी पचून इंटेस्टाइनमध्ये पोहोचतं आणि दुसऱ्याची पचनक्रिया सुरू राहते. याने शरीरात तणाव जाणवू लागतो. अशाप्रकारची समस्या पोटासोबतच संपूर्ण शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते.